Share

कोरोना व्हायरसमुळे आमदाराचा मृत्यू होण्याची देशातील ही पहिली घटना आली समोर

Published On: 

नवी दिल्ली : कोरोनाचं जगभरात थैमान सुरु असताना भारतात देखील आता त्याचा कहर सुरु आहे. सर्वसामान्य लोकांपासून ते सेलेब्रिटी आणि नेते मंडळी सुद्धा या विषाणूच्या विळख्यातून सुटू शकले नाहीत. काही नेत्यांना करोनाची लागण झाल्याचं सर्वश्रुत आहेच पण आता कोरोनाने एका आमदाराचा देखील बळी घेतला आहे.

महाराष्ट्रात सर्कस सुरु आहे हे शरद पवारांनी मान्य केलं, चंद्रकांत पाटलांचं जोरदार प्रत्युत्तर

करोना व्हायरसमुळे द्रमुकचे आमदार जे. अन्बझागन यांचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. करोनाची लागण झाल्यानंतर आठवडयाभरापूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते ६१ वर्षांचे होते. त्यांना आधीपासून किडनीचा त्रास होता. त्यामुळे त्यांची प्रकृती आणखी बिघडली.

लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, जे. अन्बझागन यांनी करोना व्हायरसच्या या संकटकाळात राज्यातील जनतेच्या सेवेसाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. मागच्या मंगळवारी त्यांनी ताप, सर्दी आणि श्वासोश्वास करताना त्रास होत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर त्यांची करोना चाचणी करण्यात आली. ज्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

सुरक्षा रक्षकांची नजर चुकवुन अनोळखी इसमाचा तुळजाभवानी मंदीरात प्रवेश

जे. अन्बझागन हे आपल्या मतदारसंघात प्रचंड लोकप्रिय होते. ते चेन्नई पश्चिमचे द्रमुकचे सरचिटणीसही होते अनेक सामाजिक कामात ते मोठ्या जोशात सहभागी होत असत. असा लोकप्रिय नेता गमावल्याने त्यांच्या चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!