मुंबई : केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवर कृषी अधिभार लावण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे पेट्रोलवर अडीच तर डिझेल चार रुपयांनी महागणार आहे. इंधनावरील अबकारी करात सातत्याने वाढत आहे. त्यामुळे इंधन स्वत होईल ही अपेक्षा मावळली आहे. अबकारी कराबाबत दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलचे दरवाढीमुळे जनता त्रस्त आहे. यावरून विरोधक सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत.
दिवसेंदिस वाढणाऱ्या दराने आता पेट्रोल शंभरी पार करण्याच्या स्थितीत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलांची किंमत कमी असतानाही भारतात मात्र,पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले असल्याने, काल शिवसेनेने राज्यभर मोर्चे काढले होते. दरम्यान, यावरून कॉंग्रेसही आज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या दरवाढीविरोधात मुंबईत काँग्रेसचे भाजप सरकार विरोधात आंदोलन सुरू झाले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या विरोधात काँग्रेसकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येतेय. निर्मला सीतारामन आज मुंबईत आल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आंदोलन सुरु आहे. निर्मला सीतारामन मुंबईतील दादर येथील भाजपच्या कार्यालयात येणार आहेत. त्यांच्यासमोरच काँग्रेस नेते निदर्शन करणार आहेत. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, मंत्री वर्षा गायकवाड, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत आणि कॉंग्रेस कार्यकर्ते दादर स्टेशन परिसरात निषेध करत आहेत.
‘देशाच्या अर्थमंत्री दादरच्या परिसरात येणार आहेत. देशात मन की बात चाललीये. आज जन की बात त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न कॉंग्रेसच्या माध्यमातून चालू आहे. हा जनसामान्यांचा एल्गार आहे. हा गरीबांचा एल्गार आहे. देशाचा जीडीपी घसरला आहे. बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात बेरोजगारांसाठी, शेतकऱ्यांसाठी काहीच तरतूद नाही. म्हणून सरकारचे कान उघडण्यासाठी आपण हा एल्गार पुकारला आहे’ असे म्हणत सचिन सावंत यांनी सरकारवर जोरदार प्रहर केला आहे.
‘आज मुंबईत निर्मला सीतारमण आपला अर्थसंकल्प किती चांगला आहे ही मोदींची मन की बात उद्योजकांना सांगण्यासाठी आल्या होत्या. म्हणून भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली जन की बात त्यांचे बंद कान उघडून ऐकवण्यासाठी कॉंग्रेसने प्रचंड मोर्चा काढला होता’ असे ट्वीट करत सावंत यांनी निर्मला सीतारामन यांच्यावर तोफ डागली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘अमित शहांच्या दौऱ्यानंतर राज्यात भाजपचा मुख्यमंत्री असेल’
- आता एसबीआयचे रुपे जनधन कार्ड घ्या आणि मिळावा 2 लाख रुपयांपर्यंतचा लाभ
- टीम इंडियाला दुसरा धक्का, रोहित पाठोपाठ शुबमन गिल आऊट
- पोलीस दलातील ‘डॉन’ कालवश; दशकभर केली सेवा
- ‘सरकारी सवलतीला सोकावलेल्या सेलिब्रेटीनो जरा भान ठेवा, तुमचे बहुसंख्य फॉलोअर्स शेतकऱ्यांच्याच बाजूने’


