Share

कणिका नंतर ‘या’ महिला बॉक्सरने मोडला क्वारंटाईनचा प्रोटोकॉल

Published On: 

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. चीन,इटली, फ्रांस,इराण, दुबई सारख्या देशांनंतर भारतातही कोरोनाचा फैलाव व्हायला सुरवात झाली आहे. केंद्र सरकार आणि राज्यसरकार युध्द पातळीवर उपाययोजना राबवत असतानाही नागरिक मात्र अद्यापही याकडे गांभीर्याने पाहत नसल्याच दिसत आहे.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने 14 दिवस क्वारंटाईन करण्यास सांगितले आहे. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी सर्व देश अटोकाट प्रयत्न करत आहेत. मात्र बोलीवाडूची गायिका कणिका कपूरनंतर आता भारताची स्टार बॉक्सर आणि राज्यसभेची खासदार मेरी कोम हिनं हा प्रोटोकॉल मोडला आहे.

जॉर्डन येथे झालेल्या आशिया-ओशिनिया ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत भाग घेऊन 13 मार्च रोजी मेरी कोम रोजी मायदेशी परतली होती. त्यानंतर कोरोनामुळे 14 दिवस घरी राहणार असल्याचे मेरीने सांगितले होते. याबाबत तिनं एक ट्वीटही केले होते. मात्र 18 मार्च रोजी राष्ट्रपती भवनात राष्ट्रापती रामनाथ कोविंद यांनी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमाला उपस्थित होती. 14 दिवस क्वारंटाईन पूर्ण न केल्याने मेरी कोमनं हा प्रोटोकॉल मोडला आहे.

राष्ट्रपतींनी अधिकृत ट्विटर हँडलने या कार्यक्रमाचे फोटो अपलोड केल्यानंतर हि बाब उघड झाली आहे. दरम्यान यावेळी कोरोना पॉझिटिव्ह बॉलिवूड गायिका कनिका कपूरच्या संपर्कात आलेले भाजपचे खासदार दुष्यंत सिंगही राष्ट्रपती भवनात उपसथित होते. सिंह आता सेल्फ क्वारेन्टाईनमध्ये आहेत. ची करोनाची चाचणी करण्यात आली. हा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. म्हणजेच त्यांना करोनाची लागण झालेली नाही.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!