Share

कोरोनापासून वाचण्यासाठी त्यांनी केला सायकल रिक्षाने तब्बल 800 किमी प्रवास !

Published On: 

🕒 1 min read

लखनौ : कोरोना व्हायरसच्या वाढत्या उद्रेकामुळे देशभरात राबविण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान अनेक देशभरातील स्थलांतरित कामगारांवर आपत्ती सदृश्य परिस्थिती ओढवली आहे. अनेक कामगार शहरांकडून आपल्या गावाकडे जात आहे. मात्र  बस, रेल्वे आणि  माल वाहतूक करणारे ट्रक यांची वाहतूक बंद केल्याने  अशा कामगारांना गावाला जाव तरी कसं असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अशातच काही  कामगार घरी जाण्यासाठी शेकडो किलोमीटर चालत आहेत. तर उत्तर प्रदेशातील चांदौलीमधूनही असेच एक प्रकरण समोर आले आहे. बिहारमधील मधुबनी येथील तीन जणांनी सायकल रिक्षात जुने स्कूटर इंजिन लावून घरी जाण्यासाठी दिल्लीतून प्रवास सुरु केला. तर या  तिघांनी  तब्बल 800 किमी प्रवास सायकल रिक्षाने केला. त्यांना दिल्लीहून लखनऊपासून 330 किमीवर असलेल्या चंदौली गावाला जायचे होते. त्यासाठी त्यांनी सायकल रिक्षा हा पर्याय निवडला. लालू महतो, गोरेलाल महतो असे या प्रवाश्यांचे नाव आहे.

प्रवासा दरम्यान त्यांना पोलिसांकडून अडवण्यात आले. मात्र त्यांची बाजू ऐकून उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना भोजन दिले. तर पुढील प्रवासाठी पास पुरवले. लॉकडाऊनमुळे अनेकांना असाच प्रवास करावा लागत आहे. तर काही नागरिक जीव धोक्यात घालून बंद ट्रक मधून, टॅकंंर्समधून प्रवास करत आहेत. शासनाकडून अशा नागरिकांना आहे तिथेच राहण्याचे आदेश दिले आहेत. तरी देखील नागरिक घरच्यांच्या ओढीने घराकडे जाण्यासाठी जीव धोक्यात घालत आहेत.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!