मुंबई: बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमार त्याच्या फिटनेसमुळे आणि वेगवेगळ्या चित्रपटांमुळे नेहमी चर्चेत असतो. सध्या अक्षय कुमार त्याच्या आगामी चित्रपट ‘राम सेतू’ मुळे चर्चेत आहे.आज राम सेतु चित्रपटाचा नवीन पोस्टर रिजिल झाला आहे. या नव्या पोस्टर मध्ये अक्षय कुमार सह चित्रपटातील इतर कलाकार ही दिसत आहे.
‘राम सेतू’चा नवीन पोस्टर
या रिलीज झालेल्या नवीन पोस्टर मध्ये अक्षय कुमारच्या चेहऱ्यावर धक्कादायक भावना दिसत आहे. त्याचबरोबर पोस्टर मध्ये असलेल्या जॅकलीन फर्नांडिस आणि नुसरत भरूजाचा फोटो देखील यामध्ये काहीतरी विचार करताना दिसत आहे. या पोस्टर मध्ये चित्रपटाची प्रदर्शित तारखेचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. हा चित्रपट 25 ऑक्टोबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अभिषेक शर्मा यांनी केले असून हा चित्रपट अरूणा भाटिया आणि विक्रम मल्होत्रा यांनी निर्मित केला आहे.
Inspired by all the amazing posters that you have been creating, here is something I worked on with the team. Hope you like it.#RamSetu trailer out on Tuesday, 11th October, 2022. pic.twitter.com/aqvQAXk6KH
— Akshay Kumar (@akshaykumar) October 7, 2022
राम सेतू ट्रेलर
अक्षय कुमारचा आगामी चित्रपट राम सेतू चा ट्रेलर 11 ऑक्टोबर 2022 रोजी रिलीज होणार आहे. अक्षय कुमारच्या या चित्रपटाची सर्वजण उत्सुकतेने वाट पाहत आहे. या आधी अक्षय कुमार रक्षाबंधन चित्रपटात दिसला होता.
राम सेतू टिझर
काही दिवसांपूर्वी रामसेतू या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला होता. या टिझर बद्दल लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. काहींना हा ट्रेलर खूप आवडला असून काहींनी या टिझर बद्दल नकारात्मक प्रतिक्रिया सुद्धा नोंदवल्या आहेत. आता हा चित्रपट कसा आहे हे चित्रपट पाहिल्यावरच समजेल. आज या चित्रपटाचे आणखी एक पोस्टर रिलीज करण्यात आलेले आहे ज्यामध्ये अक्षय कुमारचे विखुरलेले केस आहेत त्याचबरोबर तो थोडा भावनिक आणि अस्वस्थ दिसत आहे.
चित्रपटातील इतर कलाकार
राम सेतू या चित्रपटांमध्ये अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर जॅकलीन फर्नांडिस आणि नुसरत भरूचा सुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis | “एकनाथ शिंदेंशी तुमचं पटत नसेल, पण…”; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर फडणवीसांची नाराजी
- Shri Krishna Idol stolen | तब्बल ३०० वर्षांपूर्वीची श्रीकृष्णाची मूर्ती चोरीला
- Sudhir Mungantiwar । “तुमच्या कुटुंबातील लोक जर मंचावर बसत असतील तर…”; मुनगंटीवारांचा ठाकरेंना सल्ला
- Viral Video | ‘या’ लहान बाळाने पक्षाला चमच्याने भरवले आईस्क्रीम, पाहा व्हिडिओ
- Ramdas Kadam | चिन्ह गोठवल्यास शिंदे गटाचा ‘प्लॅन बी’ रामदास कदमांनी सांगितला, म्हणाले…


