Share

लोकांचे जीव वाचवण्यासाठी कठोर निर्बंधांशिवाय पर्याय नाही – शरद पवार

Published On: 

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग फोफावत आहे. काही महिन्यांपूर्वी कोरोना आटोक्यात आल्याचं चित्र निर्माण झाल्यानंतर दैनंदिन जनजीवन सुरळीत झाले होते. मात्र, नियमांचे पालन न झाल्याने राज्यात पुन्हा एकदा कोरोनाची स्थिती गंभीर झाली आहे. राज्यात लॉकडाऊन सारखे कडक निर्बंध देखील लावले जात आहे.

दरम्यान, राज्यातील कडक निर्बंधांना विविध जिल्यातील व्यापाऱ्यांसह सामान्यांनी देखील विरोध केला आहे. तसेच, राज्यात लसीकरण देखील मोठ्या प्रमाणात सुरु असून लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना केंद्रावरून पुन्हा माघारी फिरावं लागत असल्याने महाविकास आघाडीतील नेत्यांनी केंद्र सरकारने अतिरिक्त साठा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोना रुग्णांच्या आकड्यांवर चिंता व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील सध्याची स्थिती ही अतिशय चिंताजनक असून कोरोनाचे हे संकट परतावून लावण्यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा अहोरात्र कष्ट घेत आहे. मात्र, कोरोना संसर्गाची साखळी तोडून लोकांचे जीव वाचवण्यासाठी कठोर निर्बंधांशिवाय पर्याय नाही, असं वास्तव देखील शरद पवारांनी जनतेसमोर मांडलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!