बंगरूळ : विश्व हिंदू परिषदेने राम मंदिर निर्माण सहयोग अभियान सुरु केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने देखील निधी संकलनासाठी सक्रिय सहभाग घेतला असून देशभरात हे अभियान राबविले जात आहे.या प्रकल्पासाठी आतापर्यंत देणग्यांच्या स्वरुपात १ हजार ५११ कोटी रुपयांचा निधी उभा राहिला आहे.
या निधी संकलनावरून आता राजकारण होताना पाहायला मिळत आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी राम मंदिराच्या देणगीवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करत देणग्या न देणाऱ्यांची नावे गोळा करत असल्याचा दावा केला आहे.
‘राम मंदिर निधी समर्पण अभियान’चे कार्यकर्ते कर्नाटकात देणग्या गोळा करण्याचे काम करत आहे. मात्र, जे स्थानिक पैसे देत नाहीत, त्यांची नावे लिहून घेत आहेत. ते असे का करत आहे, याची मला कल्पना नाही. मात्र, नाझींनी जे जर्मनीमध्ये केले, तेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करतोय, असा आरोप कुमारस्वामी यांनी केला.
दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करणाऱ्या कुमारस्वामींचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मीडिया प्रभारी ई.एस प्रदीप यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ‘कुमारस्वामी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. कारण त्यासाठी ते लायक नाहीत’, असा घणाघात ई.एस प्रदीप यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- सिनेस्टाईल खूनाचा उलगडा; दारू पाजली, गळा आवळला, पेट्रोल टाकून गाडी दरीत लोटली
- जालनेकरांची खड्डेमय रस्त्यातून होणार सुटका; आमदार कैलास गोरंट्याल यांच्या प्रयत्नांना यश
- ये नया हिंदुस्तान है…जाणून घ्या LAC वरुन चीनने अचानक माघार का घेतली?
- पंतप्रधान पदावरच्या व्यक्तीने विरोधकांच्या भूमिकेवर यु-टर्न सारखी शेरेबाजी करणे शोभते का ?
- धुळ्यासाठी २१० कोटींचा प्रारुप आराखडा मंजूर-अब्दुल सत्तार


