Share

राज ठाकरेंच्या सभेला उत्तर प्रदेशातून येणार अडीच हजार कार्यकर्ते, सभेची जय्यत तयारी!

Published On: 

पुणे : राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेला, उत्तर प्रदेशातील अयोध्या येथून सुमारे अडीच हजार कार्यकर्ते येणार आहेत. अयोध्यातील हिंदुत्ववादी संघटनांनी राज ठाकरेंच्या सभेला पाठींबा दर्शविला आहे. सभेची तयारी पूर्णपणे आम्ही करणार आहोत. स्टेजचे काम दोन दिवसात पूर्ण करणार, अशी माहिती मनसे चे नेते दिलीप धोत्रे यांनी दिली आहे.

तसेच सभेला विरोध करणे हे ऐऱ्यागैऱ्याचे काम नाही. ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सभा आहे. त्यास विरोध करू नये. असा इशारा देण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सुमित खामकर यांनी सभेला विरोध दर्शवला होता. इतर अनेक संघटनांनी विरोध केला होता. त्याच पार्श्वभूमीवर हा इशारा देण्यात आला.

सभा उधळून लावण्याची धमकी –

महाराष्ट्र दिनी १ मे रोजी राज ठाकरेंची सभा औरंगाबाद येथे होत आहे. या सभेला परवानगी दिली तर, सभा उधळून लावू अशी धमकीभीम आर्मी कडून देण्यात आली. राज ठाकरे यांच्या सभेला शेवटपर्यंत विरोध राहील, असे भीम आर्मीने सांगितले. राज ठाकरे यांच्या चिथावणीखोर भाषणामुळे कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. हिंदू मुस्लिम दंगली होणार आहेत, असे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांची सभा होऊ देणार नाही, असे भीम आर्मी कडून सांगण्यात आले.

महत्वाच्या बातम्या : 

 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!