Share

मराठवाड्याच्या रेल्वे कनेक्टीव्हिटीसाठी कोणताही निधी नाही

Published On: 

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्प आज माडण्यात आला. यामध्ये मराठवाड्याच्या रेल्वेची कनेक्टीव्हिटी वाढवण्यासाठी निधी देण्यात आला नसल्याने मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसली आहेत.  दरम्यान पुणे – नाशिक या मध्यम अतिजलद रेल्वे मार्गाचे काम हाती घेण्यास राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. या रुटची लांबी २३५ किलोमिटर तर गती ही २०० किलोमिटर प्रती तास असणार आहे. या साठी महाराष्ट्र सरकारने अपेक्षित खर्च १६ हजार ३९ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे.

मराठवाड्यामध्ये परभणी, पुर्णा, मुदखेड असे तीन जक्शन आहेत. संपूर्ण मराठवाड्यामध्ये नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, परभणीमधील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, औरंगाबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, महात्मा गांधी खासगी विद्यापीठ, औंढानागनाथ, परळी, घृष्णेश्वर हे तीन जोर्तिलिंग आहेत. तर नांदेडला गुरु गोबिंदसिंहाची समाधी, हिंगोलीत संत नामदेव मंदिर, परभणीत संत जनाबाइ, औरंगाबादेत संत एकनाथ महाराज मंदिर तसेच वेरुळ, अजिंठा, औरंगाबाद लेणीसह, देवगिरी किल्लासह औरंगाबाद शहरामध्ये अनेक पर्यटन केंद्रे देखील आहेत. तर औरंगाबाद ही राज्याची पर्यटन राजधानी देखील आहे.

परंतू अनेक वर्षांच्या मागणीनंतर नांदेड – मुदखेड येथे डबल ट्रॅकचे काम दीड वर्षापुर्वी सुरु झाले. परंतू औरंगाबादपासून मनमान पर्यंत डबल ट्रक तसेच इलेक्ट्रीकल ट्रेन करण्याची अनेक वर्षांपासूची मागणी आहे. परंतू या सर्व बाबींवर केंद्र सरकार तर लक्ष देत नाहीच. पण आता राज्य सरकारकडून देखील मराठवाड्याच्या रेल्वे विकासासाठी कोणताही निधी देण्यात आला नाही. त्यामुळे येथील राजकारणी आता काय भूमिका घेतात या कडे पुर्ण मराठवाड्यातील नागरिकांसह प्रवाश्यांकडे लक्ष लागले आहे. जसा निधी पुणे – नाशिक रेल्वेसाठी राज्य शासनाने दिला आहे. तसा मराठवाड्यासा देणे गरजेचा होता. परंतू राज्य सरकारने घोर निराशा केली असल्याचे मत खासदार डॉ. भागवत कराड यांनी महाराष्ट्र देशाशी बोलताना सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या : 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!