टीम महाराष्ट्र देशा – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उप[उपाय म्हणून संपूर्ण देशात लॉक डाऊन जाहीर करण्यात आलं आहे. यामुळे इतर क्षेत्रां बरोबरच शैक्षणिक क्षेत्राचे नियोजनावरही परिणाम झाला आहे. तसेच परीक्षांबाबातच वेळापत्रकही कोलमडल आहे.
याबाबत निर्णय घेण्यासाठी आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंतयांनी राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून साधला संवाद. विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षेसंदर्भात समिती नेमली आहे . या समितीचा घेतला आढावा.
कोरोनाची सध्याची परिस्थिती पाहता विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतरच निर्णय घेणार तसेच विद्यार्थ्यांनी चुकीच्या माहितीवर आणि अफवांवर विश्वास ठेऊ नये असं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आवाहन केले आहे.
तसेच आपापल्या पातळीवर परीक्षा घेण्याची सर्व विद्यापीठांची तयारी. ऑनलाईन अध्यापन सुरू. ऑनलाईन परीक्षांसंदर्भात कोणताही निर्णय नाही. परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना वेळोवेळी माहिती देणार. कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही, याची संपूर्ण काळजी घेणार आहोत असही सामंत यांनी सांगितले आहे.
विद्यापीठांमध्ये कोरोनाच्या चाचणी प्रयोगशाळा सुरू करणार-
सर्व विद्यापीठांमध्ये #कोरोना च्या चाचणी प्रयोगशाळा सुरू करणार. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात प्रयोगशाळा सुरू. औरंगाबादचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात प्रयोगशाळेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे अशी माहिती सामंत यांनी दिली.
तसेच पुणे विद्यापीठाकडून कोरोनाशी लढा देण्यासाठी व्हेंटिलेटर तयार केले असून त्याचा लवकरच पाच रुग्णालयांमध्ये वापर होणार. एसएनडीटी विद्यापीठामध्ये ‘जीवनरक्षक’ कोर्सची निर्मिती. हा अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी आरोग्य यंत्रणेला मदत करणार अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री @meudaysamant यांनी राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून साधला संवाद. विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षेसंदर्भात नेमली समिती. या समितीचा घेतला आढावा. pic.twitter.com/TmIONvyOUd
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 24, 2020
आपापल्या पातळीवर परीक्षा घेण्याची सर्व विद्यापीठांची तयारी. ऑनलाईन अध्यापन सुरू. ऑनलाईन परीक्षांसंदर्भात कोणताही निर्णय नाही. परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना वेळोवेळी माहिती देणार. कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही, याची संपूर्ण काळजी घेणार- मंत्री @meudaysamant
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 24, 2020
पुणे विद्यापीठाकडून #coronavirus शी लढा देण्यासाठी व्हेंटिलेटर तयार. त्याचा लवकरच पाच रुग्णालयांमध्ये वापर होणार. एसएनडीटी विद्यापीठामध्ये ‘जीवनरक्षक’ कोर्सची निर्मिती. हा अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी आरोग्य यंत्रणेला मदत करणार- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री @meudaysamant
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 24, 2020
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

