वाळूज : वाळूज महानगरसह वाळुज परीसरात शनिवार पासुन नागरिक काेराेना आजाराला राेखण्यासाठी सतर्क झाले आहेत. नागरिकांनी घराबाहेर जाणे बंद केले आहे. स्थानिक शासनाच्या आदेशाचे नागरिक पालन करत आहेत. रविवार राेजीच्या जनता कर्फुला पुर्ण प्रतिसाद येथील नागरिकांनी दिला. तर साेमवारीही स्वत:हुन नागरिक घराबाहेर पडले नव्हते. वाळुज येथील साेमवारी भरणारा अठवडी बाजार हुसकावुन लावण्यात आला हाेता.
कोरोना आजाराला आळा घालण्यासाठी पंतप्रधान यांनी केलेले आव्हानास नागरिकाकडुन माेठा प्रतिसाद दिला जात आहे. त्यामुळे सतर्क झालेले नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. अति महत्वाच्या कामासाठी एक, दाेन नागरिक घराबाहेर पडतांना दिसतात.
जीवनावश्यक वगळता सर्व बंद करण्यात आले आहे. रविवार राेजीचा जनता कर्फुही नागरिकांनी यशस्वी केला. हे चित्र वाळुज महानगरातही हाेते. सकाळपासुन नागरीकांनी शंभर टक्के बंद पाळून कोरोना रोगापासून बचावासाठी वृद्ध, नवयुवक महिला, विद्यार्थी, शेतकरी सर्वांनी दुकानें, हाॅटेल, धाबे शनिवार पासुन बंद केलेली होती. गजबजलेला नगर महामार्गावर शुकशुकाट हाेता. कोरोनाला आळा घालण्यासाठी गर्दी होणार नाही याची पुरेपुर दक्षता नागरीकांनी घेत ग्रामपंचायत प्रशासनाने 100% बंद यशस्वी करुन घराबाहेर येऊ दिले नाही.
नागरीकांनी घरात टिव्ही व वर्तमानपत्रे वाचत कुटुबासह वेळ घालवला. तर साेमवार राेजी वाळूज येथे आठवडी बाजार भरतो. परंतु कोरोनाला आळा घालण्यासाठी सर्वच आठवडी बाजार रद्द केले असल्याने हा बाजार भरणार नाही, असे ग्रामविकास अधिकारी सुभाष लव्हाळे यांनी कळवुन बाजारात कोणीही येऊ नये. असे अवाहन केले होते.
मात्र काही व्यापाऱ्यांनी ग्रामपंचायतच्या अवाहनाचा व कलम 144 चा आदेश धुडकावत दुकाने थाटली होती. परंतु पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत त्यांना हुसकावून लावले. त्यानंतर मात्र बाजार परीसरात कोणीही फिरकले नसल्याने सर्वत्र शुकशुकाट होता.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

