अहमदनगर : पुत्र प्राप्तीसाठी सम-विषम फॉर्म्युला सांगणाऱ्या प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात pcpndt कायद्यानुसार संगमनेर न्यायालयात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाची पहिली सुनावणी आज झाली आहे. या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं होत. आता इंदुरीकर महाराजांना आपलं म्हणणं मांडण्याची संधी देण्यात आली आहे. येत्या 7 अगस्टला इंदुरीकर महाराजांना कोर्टात हजर राहण्याचे समन्स संगमनेर कोर्टाने बजावले आहे.
बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी सरकारने घेतलेला ‘हा’ निर्णय ठरतोय लाभदायक
या प्रकरणात ज्यांनी तक्रार दाखल केली होती त्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकारी रंजना गवांदे यांनी राजकीय दबावामुळे गुन्हा दाखल केला जात नव्हता, असा आरोप केलाय. इंदोरीकर महाराज यांचे वक्तव्य महिलांसाठी अन्यायकारक आणि कायद्याविरोधात असल्याने तक्रार दाखल केल्याचा त्यांचा दावा आहे. आज सरकारतर्फे अॅड. लीना चव्हाण यांनी कोर्टात बाजू मांडली. इंदोरीकरांनी अद्याप आपला वकील दिलेला नाही. आज केवळ समन्स बजाविण्याचे काम न्यायालयात झाले आहे.
या खटल्या विषयी बोलताना चव्हाण म्हणाल्या की, अतिशय बळकट असा हा खटला आहे. इंदोरीकर महाराजांनी कायद्याचे उल्लंघन केले आहे. त्यांचे विधान सोशल मिडियातून संपूर्ण राज्याने ऐकले आहे. त्यामुळे त्यांना शिक्षा होऊ शकते. या खटल्याची पुढची तारीख सात ऑगस्ट ठेवण्यात आली आहे. त्यासाठी त्यांना स्वतः न्यायालयात यावे लागेल. वकिलामार्फत जामिनासाठी अर्ज करावा लागेल. न्यायालयाचा हा निर्णय अमान्य असल्यास त्यांना वरच्या न्यायालयात जाऊन खटला थांबविण्यासाठी अर्ज करावा लागेल.
इंदुरीकर महाराज यांच्या विरोधात संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादीवरून संगमनेर कोर्टात PCPNDT अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे इंदुरीकर समर्थक आता आक्रमक झाले आहे. इंदुरीकर समर्थकांनी काही दिवसांपूर्वी संगमनेर तहसील कार्यालयात निवेदन दिले होते. इंदुरीकर यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी केली आहे. जर इंदुरीकर महाराजांवरील गुन्हा मागे घेण्यात आला नाहीतर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही समर्थकांनी दिला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस ‘या’ बाबतीत राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला असल्याचा जयंत पाटलांचा दावा
तर दुसरीकडे इंदुरीकर महाराजांना राज्यातून पाठींबा वाढत आहे. सामाजिक कार्यकर्ते बाबाराजे देशमुख यांनी देखील इदुरीकर महाराज यांना पाठींबा दिला आहे. ‘महाराज आमची तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे तुम्ही घाबरू नका. छत्रपतींचे सर्व मावळे तुमच्या सोबत आहेत. स्वतःला एकटे समजू नका. वेळ आली तर आम्ही रस्त्यावर उतरू’. अस बाबाराजे देशमुख म्हणाले आहेत. तर महाराष्ट्राच्या जनतेला देखील त्यांनी महाराजांच्या मागे उभे राहण्याचे आवाहन केले आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाची तुम्हाला शपथ आहे महाराज तुम्ही कीर्तन बंद करू नका अशी कुत्री रोज भुंकतील त्यांच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका यांच्याकडे लक्ष द्यायला आम्ही समर्थ आहोत’ अस आवाहन देखील बाबाराजे देशमुख यांनी इंदुरीकर महाराज यांना केले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

