नवी दिल्ली : गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाने संपूर्ण जगला घातलेला विळखा हा वाढतच आहे. तर दुसरीकडे देशातील काही राज्यांना मुसळधार पावसाचा सामना करावा लागतो आहे. आसाम राज्याला पुराचा विळखा पडलेला असून राजधानी दिल्लीतही गेल्या काही दिवसांत पावसाची संततधार सुरु आहे. या पावसामुळे दिल्लीच्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं पहायला मिळालं. भारतीय जनता पार्टीचा दिल्लीचा खासदार गौतम गंभीरने या परिस्थितीवरुन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाला टोला लगावला आहे.
गौतम गंभीरने ट्विट करत केजरीवालांवर टीका केली आहे. दिल्ली वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आझादपूर अंडरपास, साऊथ एव्हेन्यू रोड, प्रल्हादपूर अंडरपास, नवी दिल्ली रेल्वे स्टेशन यासारख्या भागांमध्ये पाणी साचलं होतं. लंडन-पॅरिस सारख्या रस्त्यांसाठी दिल्ली सरकारने रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प राबवलाय असं ऐकायला मिळालं, याची जाहीरात कधी पहायला मिळेल मुख्यमंत्री जी?? असे ट्विट त्याने केले आहे.
सुना है लंदन-पैरिस जैसी सड़कों पर दिल्ली सरकार "Rain Water Harvesting" की योजना चला रही है!
इसकी Advertisements देखने को कब मिलेंगी मुख्यमंत्री जी? pic.twitter.com/fY2Pt8DOvt
— Gautam Gambhir (@GautamGambhir) July 19, 2020
गौतम गंभीरने दोन ट्विट केले आहेत. दुसऱ्या ट्विटमध्ये त्याने असं लिहले आहे कि, जाहीरातींचा अपवाद वगळता दिल्ली सरकारच्या अखत्यारीत नेमकं काय काय येतं हे आम्हाला सांगा. केंद्र आणि दिल्ली पालिकेला दोष देत ६ वर्ष उलटली. जेवढा पैसा हॅशटॅग आणि जाहिरातींवर खर्च केला जातोय, तोच पैसा दिल्लीसाठी खर्च केला असता तर दिल्लीवासियांनी तुमचेही आभार मानले असते. असे दुसऱ्या ट्विटमधून त्याने निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री जी, आज लोगों को बता ही दीजिये -दिल्ली सरकार के अंतर्गत क्या क्या आता है विज्ञापन विभाग के इलावा?
6 साल हो गए Centre और MCD का नाम जपते जपते!
— Gautam Gambhir (@GautamGambhir) July 19, 2020
दरम्यान, जाहिरातींवर पैसा खर्च करणाऱ्या अरविंद केजरीवालांना गौतम गंभीरने आपल्या ट्विटमध्ये २१ व्या शतकातील तुघलक अशी उपमा दिली आहे.
यंदा आयपीएलची परदेशवारी निश्चीत ?
धोका वाढला : नवी मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या ११ हजाराच्या पुढे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

