🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान परिषदेच्या कामकाजाला सुरूवात झाली. यावेळी आमदार सुभाष देसाई यांची विधान परिषद सभागृह नेते म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन प्रस्ताव सभागृहात मांडण्यात आला. देसाई साहेब हे ज्येष्ठ नेते असून त्यांना कामाचा दांडगा अनुभव आहे, अशा शब्दात आमदार जयंत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. शिवाय विधानपरिषदेच्या विरोधीपक्ष नेतेपदी निवड झाल्यानंतर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्या अभिनंदन प्रस्ताव मांडण्यात आला. मुद्द्याला धरून विरोध करण्याचे काम आपल्याकडून होईल असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
त्यानंतर आमदार किरण पावसकर यांनी सभागृहाला संबोधित केले. आमदार प्रवीण दरेकर विरोधीपक्ष नेते पदाचा वापर त्यांच्या कारकिर्दीत रखडलेल्या सर्व योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करतील, असा विश्वास व्यक्त करत पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी माननीय न्यायमूर्ती शरद बोबडे यांची भारताचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदनपर प्रस्ताव मांडण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती शरद बोबडे महाराष्ट्राचे आहेत याचा जास्त अभिमान आहे. संविधानाच्या उद्दिशिकेच्या वाचनाद्वारे न्या. बोबडेंचा सन्मान झाला याचे समाधान आहे. देशातली अस्वस्थता व उद्रेक पाहता योग्य निर्णय घेणारे व्यक्तिमत्व आपल्या देशाला लाभले आहे, अशा शब्दात आमदार हेमंत टकले यांनी त्यांचे अभिनंदन केले.
विधान परिषदेच्या कामकाजाच्या शेवटी सभागृहात विधान परिषद सभागृहाचे नेते शिवाजीराव दत्तात्रय पाटील यांच्या दु:खद निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडण्यात आला. आमदार जयंत पाटील शोक प्रस्ताव दरम्यान म्हणाले की, “मा. शिवाजीराव पाटील यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असे. असंख्य शिक्षक परिषदा त्यांनी घेतल्या. त्यांच्या संघटनेचे काम हे देशव्यापी होते. अनेक शिक्षकांची कामे त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून झाली. मा. शिवाजीराव पाटील हे माझ्या तालुक्यातील आहेत. त्यांच्या बद्दल मनात एक वेगळेच स्थान आहे. मला खात्री आहे त्यांचा संघर्ष हा महाराष्ट्रातील सर्व शिक्षक संघटना डोळ्यापुढे ठेवून आपली वाटचाल करतील.”
तसेच आमदार विक्रम काळे यांनी देखील मा. शिवाजीराव दत्तात्रय पाटील यांच्या शोक प्रस्तावादरम्यान सभागृहाला संबोधित केले. मा. शिवाजी पाटील यांचे कर्तृत्व पाहून आदरणीय पवार साहेबांनी एका प्राथमिक शिक्षकाला सभागृहात काम करण्याची संधी दिली. अनेक शिक्षण संस्थांच्या मार्फत त्यांनी मागील ४६ वर्ष या कार्यात आपला ठसा उमटवला, असे त्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1206548679634477067?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1206546318748876800?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
