Share

गुन्हे सिद्ध होण्यासाठी लॅबचे कार्य महत्त्वपूर्ण – गृहमंत्री अनिल देशमुख

Published On: 

मुंबई : पुणे येथील प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेला (फॉरेन्सिक लॅबला) गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली. गुन्हे सिद्ध करण्याकरिता या लॅबचे मोठे योगदान असून लॅबच्या माध्यमातून सुरू असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी काढले.

गृहमंत्री देशमुख यांनी फॉरेन्सिक लॅबच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबत चर्चा केली, त्यांच्या कामाची पद्धत, अडीअडचणी जाणून घेतल्या.

प्रारंभी प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा पुण्याचे उपसंचालक राजेंद्र कोकरे यांनी गृहमंत्र्यांचे स्वागत करून या प्रयोगशाळेत होत असलेल्या कामकाजाची माहिती दिली. संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण, जीवशास्त्र, डीएनए, विषशास्त्र, सामान्य विश्लेषण व उपकरणे, आणि दारूबंदी व उत्पादन शुल्क विभागामध्ये करण्यात येणाऱ्या कामकाजावर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी सहायक संचालक धर्मशिला सिन्हा, नीलिमा बक्षी, सोनाली फुलमाळी, वैशाली शिंदे, अंजली बडदे, महेंद्र जावळे आदी उपस्थित होते.

रोगाशी लढायचंय, रोग्याशी नाही, कॉलर ट्यूनवर आंबेडकरांचा तीव्र आक्षेप

…अन्यथा घरात घुसून मारू, गृहमंत्री अमित शहांचा सज्जड दम

#lockdown : कायदा व सुव्यवस्था चोख ठेवावी; अनिल देशमुख यांचे आदेश

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!