Share

…अन्यथा घरात घुसून मारू, गृहमंत्री अमित शहांचा सज्जड दम

Published On: 

🕒 1 min read

कोलकाता : ‘आम्हाला जगभरात शांतता अपेक्षित आहे. हल्ला करणारे आपला मृत्यू निश्चित करून येत असतो. आता मात्र भारतावर हल्ला करणाऱ्यांची खैर नाही. भारतही मागे राहणार नाही. शत्रुला घरात घुसून मारू, ‘अमेरिका-इस्रायल ज्याप्रमाणे घरात घुसून मारतात, आता भारताचेही नाव घरात घुसून मारणाऱ्या देशांच्या यादीत आले आहे.’ अस म्हणत गृहमंत्री अमित शहा यांनी पाकिस्तानला सज्जड दम दिला आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा गार्डच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अमित शहा बोलत होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी एक दिवसाच्या कोलकाता दौऱ्यावर आहेत. पश्चिम बंगालचे भाजप अध्यक्ष दिलीप घोष यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमित शाह यांचे स्वागत केले. यादरम्यान, नागरिकत्त्व सुधारित कायद्याच्या (सीएए) विरोध करणाऱ्या वाम मोर्चा आणि काँग्रेसच्या शेकडो आंदोलकांनी विमानतळाबाहेर ‘परत जा’च्या घोषणा दिल्या. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला.

‘पाच वर्षांत NSG ने भारत सरकारकडून ज्या काही अपेक्षा ठेवल्या होत्या, त्या सर्व अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील सरकारने पूर्ण केल्या आहेत. अस आश्वासन यावेळी गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!