औरंगाबाद : शिवाजीनगरच्या भुयारी मार्गाचा प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय आढावा बैठकीत या भुयारी मार्गाच्या प्रस्तावाला अर्थमंत्री अजित पवार यांनी मंजुरी दिली आहे. भुयारी मार्गाचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत खा. इम्तियाज जलील यांनी ठेवला होता.
खा. इम्तियाज जलील यांनी शिवाजीनगर येथे भुयारी मार्ग व्हावा यासंबंधी केंद्रीय रेल्वे मंत्री, केंद्रीय रेल्वे बोर्डचे अध्यक्ष यांचेकडे पाठपुरावा केला होता. रेल्वे प्रशासनाने शिवाजीनगर भुयारी मार्गच्या ३८.६० करोड रुपयाच्या प्रस्तावाला महाराष्ट्र शासनासोबत भागीदारी तत्वावर मान्यता दिली होती. रेल्वे विभागाने भागीदारी तत्वावर १६.५५ करोड निधीची मंजुरी देवुन महाराष्ट्र शासनास २२.०५ करोड रुपयाच्या निधीची उपलब्धता करुन देण्याची विनंती केली होती.
विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा वार्षिक योजना राज्यस्तरीय बैठकीत खा. इम्तियाज जलील यांनी शिवाजीनगर भुयारी मार्ग बनविण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या भागीदारी तत्वावरील हिश्याचे २२.०५ करोड रुपयाच्या निधीची मागणी केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रस्तावाचे महत्व लक्षात घेत खासदार इम्तियाज जलील यांनी मागणी केलेल्या निधीला तात्काळ मंजुरी दिली.
महत्वाच्या बातम्या
- विद्यार्थ्यांच्या खास मागणीस्तव, स्मार्ट सिटी बस आता नाईक नगर पर्यंत धावणार
- कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या डोसला आजपासून सुरुवात
- कोरोनाचा संसर्ग वाढतोय ! अजित पवारांनी दिले कठोर पाऊल उचलण्याचे संकेत
- इच्छुक उमेदवारांची वॉर्डा-वॉर्डातल्या समस्या सोडविण्यासाठी पालिकेत धाव
- दुख:दायक! लग्नाला जाणाऱ्या दोन युवकांवर काळाचा घाला


