🕒 1 min read
मुंबई : सोशल मीडियावर नेहमीच काही न काही ट्रेण्ड असतो. सोशल मीडियावर सिनेकलाकार नेहमीच चर्चेत राहण्यासाठी आपले फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करत असतात. यातच आता छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका FIR मधील पोलीस चंद्रमुखी चौटाला म्हणजेच कविता कौशिकने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ अपलोड केला. तिने हा नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती तिच्या पतीसोबत म्हणजेच रोनित बिस्वाससोबत असून यामध्ये ती चक्क पडली असल्याचं दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये ती आपल्या पतीसोबत योगा करताना दिसत आहे. तिचा पती जमिनीवर बसला असून ती त्याच्या खांद्यावर उभं राहण्याचा प्रयत्न करतेय. मात्र, रोनित बिस्वासच्या खांद्यावर उभं राहण्याचा प्रयत्न करत असताना ती थेट जमिनीवर कोसळते. तसेच, जमिनीवर कोसळल्यानंतर कविता आणि तिच्या पतीमध्ये हशा पिकलेला आपल्याला या व्हिडीओमध्ये दिसतो.
या व्हिडीओसोबत दिलेले कॅप्शनसुद्धा अगदीच मार्मिक आहे. ”या जगात कोणीही आपले अपयश सोशल मीडियावर पोस्ट करत नाही. आभासी जगात आपण जे पाहतो, ते परफेक्ट फोटो असतात. त्यामध्ये कोणतीही चूक नसते. मात्र, हे आयुष्य यश आणि अपयशाने भरलेलं आहे. यामधून आपण शिकत जातो. पण या व्हिडीमध्ये मी जी पडली आहे, ते अपयश फक्त सकाळी भरपूर पराठे खाल्ल्यामुळे येते,” असे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.
No one is posting their failures online, what we see is picture perfect shots, but life is about correction , falling and getting up to fix one's self. This is what happens when it's too many paranthas for breakfast ???? pic.twitter.com/maWM4IELB5
— Kavita Kaushik (@Iamkavitak) February 19, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- मराठवाड्यात कोरोनाचा उद्रेक; जालन्यात संपूर्ण गाव सील; परभणीत आठवडी बाजार बंद
- जालनेकरांनो काळजी घ्या! जिल्ह्यात कोरोना वाढतोय; शनिवारी तिघांचा बळी; ७० नवे रुग्ण
- परभणीत ३१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; उपचारादरम्यान एकाचा मृत्यू
- दीक्षाभूमी एक्स्प्रेसने मार्ग बदलला; जालना-औरंगाबादेतील उत्तर भारतीय नागरिकांची गैरसोय
- पालम तालुका व ६५ गावे नळ पाणीपुरवठा योजनेला गती द्या : गुलाबराव पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
