Share

Sanjay Raut | “राम मंदिराचा प्रश्न न्यायालयात सुटतो, मग कर्नाटक सीमाप्रश्न का नाही?”; संजय राऊतांचा परखड सवाल

Published On: 

🕒 1 min read

Sanjay Raut | मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून सध्या राज्यातील राजकारण तापलेलं आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. या घटनेला आता सात दशकांहून जास्त काळ उलटला. मात्र, कर्नाटकसोबत असलेला सीमाप्रश्न अजूनही सुटलेला नाही. सीमाभागातील अनेक गावांना महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा असल्याचा दावा सातत्याने महाराष्ट्राकडून केला जात आहे. बेळगावमध्ये यावरून मोठा संघर्ष पाहायला मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

“न्यायालय राम मंदिराचा प्रश्न सलग सुनावणी लावून सोडवू शकतं. पण 20 ते 25 लाख नागरिकांचा प्रश्न असलेल्या  महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत मात्र तारीख पे तारीख सुरू आहे. सीमाप्रश्न आणि महाराष्ट्रातील घटना बाह्य सरकारची केस असेल त्याच्यावर मात्र तारखांवर तारखा मिळत आहेत,” असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणालेत.

आधीच्या सरकारवर खापर फोडण्यापेक्षा आपण आता काय करू शकतो हे आताच्या सरकारने पहावं, असा टोला संजय राऊत यांनी यावेळी बोलताना लगावला. त्याचबरोबर नवीन वर्षात आमच्या बाजूने चांगलं चिन्ह दिसेल लागलेलं, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.

पंतप्रधानांनी किंवा गृहमंत्री सीमावादाबाबत मध्यस्थी केली पाहिजे. कारण दोन्ही राज्यांमध्ये एकाच पक्षाचा सरकार आहे. बोम्मई असे म्हणतात अमित शाह (Amit Shah) यांना भेटून काहीच फायदा नाही. परंतु आम्ही बोलत आहे की फायदा आहे, असं राऊत म्हणालेत.

अमित शाह महाराष्ट्राचे जावई आहेत. त्यांच्या पत्नी कोल्हापूरच्या आहेत. सीमाभागाचे सर्वात जास्त चटके कोल्हापूरला बसत असतात. त्यामुळे या प्रश्नासंदर्भात त्यांना जास्त माहिती असेल. न्यायालयात अनेक प्रकरण आहे. शाहा यांनी यात मध्यस्थी करावी, असंही ते म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!