Share

सुशांतच्या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलरला पहिल्याच दिवशी लाखो प्रेक्षकांची पसंती

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : १४ जून रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केल्यामुळे बॉलिवूड मध्ये चांगलीच खळबळ निर्माण झाली असून चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला होता. अत्यंत प्रभावी व हुशार व्यक्तिमत्व असलेल्या सुशांत ने अचानक मुंबईतील बांद्रामध्ये राहत्या घरी आपले जीवन संपविले.

आपल्याच सरकार विरोधात शिवसैनिक आक्रमक, चड्डी- बनियान घालून करणार आंदोलन

यावर्षीच्या सुरुवातीलाच त्याचा चित्रपट रिलीज होणार होता मात्र कोरोनामुळे सर्व चित्रपटगृह बंद करावे लागले होते. त्यामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन देखील पुढे ढकलण्यात आले होते. ‘दिल बेचारा’ असं त्याच्या शेवटची भूमिका ठरलेल्या चित्रपटाचं नाव असून आज ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. फॉक्स स्टार या प्रोडक्शनचा हा चित्रपट आहे. तर येत्या २४ जुलै रोजी हा चित्रपट डिजनी व हॉटस्टार या ऑनलाइन माध्यमातून हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.

मोठी बातमी : शरद पवार आज पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

सुशांत च्या अचानक जाण्याने सर्वच चाहत्यांना धक्का बसला असून या चित्रपटामुळे त्याच्या आठवणी परत एकदा जाग्या होणार आहेत. सुशांत सिंह राजपूत च्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस अनेक बड्या स्टार्सची देखील चौकशी करत आहेत. दरम्यान, या चित्रपटाला भरघोस प्रतिसाद देऊन नेपोटीजमला चांगलाच दणका देण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी देखील मोट बांधली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!