Share

महाराष्ट्रातील परदेशात अडकलेल्या नागरिकांना आणण्यासाठी ठाकरे सरकारने उचलले पाऊल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोनामुळे बंद असलेल्या हवाई वाहतुकीमुळे अनेक भारतीय हे आज विदेशात अडकले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे. तर आता महाराष्ट्र राज्य सरकारनेही महाराष्ट्रातील विदेशात असणाऱ्या नागरिकांची नोंद करून घेण्यास सुरवात केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबतचे ट्विट करण्यात आले आहे. तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक असाल आणि परदेशात अडकला असाल तर आम्ही तुम्हाला विनंती करतो की खालील लिंकवर क्लिक करुन फॉर्म भरा. आम्ही ही माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडे पाठवून त्यांच्याशी समन्वय साधून हवाई वाहतुकीवरील निर्बंध उठल्यानंतर तातडीने तुम्हाला परत आणण्याची व्यवस्था करु,” असं मुख्यमंत्री कार्यलयाच्या अकाऊंटवरुन करण्यात आलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

या ट्विटबरोबर शेअऱ केलेल्या लिंकवर क्लिक केल्यास एक गुगल फॉर्म ओपन होतो. यामध्ये माहिती देणाऱ्याचा इमेल आयडी, संपूर्ण नाव, कंट्री कोड (+91, +101 फोन क्रमांकासाठी वापरण्यात येणारे कोड), संपर्क क्रमांक, कोणत्या देशातील कोणत्या शहरामध्ये अडकले आहात, परदेशात जाण्याचे कारण काय, पासपोर्ट क्रमांक, व्हिजा कोणत्या प्रकारचा आहे, व्हिजाची मुदत कधी संपत आहे यासारखे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत.

दरम्यान भारत सरकार संयुक्त अरब अमिरातीमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी एअर इंडियाची सहा विशेष विमाने पाठवणार आहेत. ही विमाने प्रामुख्याने दक्षिण भारतीय कामगारांना परत आणणार आहे. पहिल्या टप्प्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये भारत अमेरिका, ब्रिटन, मलेशिया, इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करणार आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!