Share

आज संपणार औरंगाबाद महानगर पालिकेची मुदत, लवकरच होणार प्रशासक नियुक्तीची घोषणा

Published On: 

औरंगाबाद : मुंबई महानगर पालिका कायद्यानुसार आज संध्याकाळी सहा वाजता महानगर पालिकेची मुदत संपणार आहे. नगर विकास खात्याने प्रशासक नेमण्याची शिफारस राज्य निवडणूक आयोगाला केली आहे, ती मान्य झाल्याची चर्चा आहे. केवळ पदाधिकाऱ्यांच्या हट्टापायी, तो निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे आज संध्याकाळी सहा वाजता महापौर नंदकुमार घोडेले यांची कोरोनाच्या संदर्भातील शेवटची व्हिडिओ प्रेस काॅन्फरन्स होईल आणि त्यानंतर प्रशासक नियुक्तीची घोषणा होईल, असा प्लॅन आहे.

महानगर पालिका 29 एप्रिल पुर्वी अस्तित्वात येणे कायद्याने बंधनकारक होते. पण ते आता शक्य नाही. त्यामुळे आता महानगर पालिकेवर प्रशासक नेमण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

औरंगाबादकरांच्या मनात महानगर पालिकेवर प्रशासक नियुक्त करावा, असं होतं. पण तशी परिस्थिती निर्माण होत नव्हती. अखेर कोरोना विषाणूमुळे आता ते शक्य झालं आहे. कारण संपूर्णपणे कोरोनामुक्त महाराष्ट्र होत नाही, तोपर्यंत कोणतीही निवडणूक राज्यात होणार नाही. त्यामुळे येणाऱ्या जून महिन्यापर्यंत तरी निवडणूक होण्याची शक्यता नाही.

दरम्यान, तोपर्यंत जरी अस्तिककुमार पांडेय सारखा प्रशासक नेमला तरी चालू शकते. या काळात शासनाने काही महत्वाच्या योजना औरंगाबादमध्ये राबवून घ्याव्यात. म्हणून.मजेत, त्या योजनेत पसेंन्टेज खर्च होणार नाही.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!