Share

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संयम बाळगून राज्याला मोठ्या भावाप्रमाणे धीर देतायत : सुप्रिया सुळे

Published On: 

मुंबई :  राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी सुप्रिया सुळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचे कौतुक केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संयमाणे या सर्व परिस्थितीला तोंड देत आहेत. तर एका बाजूला राज्यातील जनतेलाही मोठ्या भावाप्रमाणे दिलासा देत आहेत, असेही सुळे म्हणाल्या.

राज्यात कोरोनाच्या सर्वाधिक चाचण्या झाल्या आहेत. उद्धव ठाकरे समोर येऊन सर्वांना दिलासा देत आहेत. उद्धव ठाकरेंकडे राज्य मोठा भाऊ म्हणून पाहात आहे. आपल्या कुटुंबातीलच कोणीतरी आपल्याशी बोलत आहे, असं लोकांना वाटतं,’ असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. तसंच ‘सरकारवर कोणी टीका करत असेल तरीही आपले मुख्यमंत्री म्हणतात त्याप्रमाणे आपला फोकस बदलायचा नाही. ज्यांना टीका करायची आहे त्यांना करू द्या…त्यांच्याकडे रिकामा वेळ असेल’, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना टोला लगावला.

तसेच सुळे पुढे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी मिळालेल्या वेळेचा उपयोग अभ्यास करण्यासाठी करावा. तर अफवा पसरवणाऱ्यांंपासून लांब राहावे. कोणीही सोशल मीडियावरून अफवा पसरवू नये. आपल्या घरीच सुरक्षित आणि स्वच्छ राहून  प्रशासनाला सहकार्य करावे. पोलीस बंधू आपल्यासाठी रस्त्यावर उतरून स्वतःचा जीव धोक्यात घालत आहेत.

तर काही पोलीस आज या कोरोनाच्या युद्धात शहीद झाले आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांना सरकारकडून छोटीशी मदत म्हणून घरात एक नोकरी आणि 50 लाख रुपय देण्याची घोषणा करण्यात आली आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. तर सार्वजनिक ठिकाणी जाताना मस्का  लावा, असे  आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!