पुणे : पुण्यात रेल्वे स्थानक परिसरातून एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून रेल्वेतील दोन कर्मचारी तसेच रिक्षा चालकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलीसांनी आठ आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 14 वर्षीय पिडीत मुलीने तक्रार दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी 31 ऑगस्ट रोजी गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानक परिसरात आली होती. रात्री तिला आरोपींनी आता गाडी नाही. गावी कशी जाणार असे म्हणत आम्ही तुझी राहण्याची व्यवस्था करतो, असे सांगून बाहेर आणले. तिचे अपहरण करून तिला वानवडी परिसरात नेले. त्या ठिकाणी आरोपींनी रात्री तिच्यावर बलात्कार केला. तसेच, दुसऱ्या दिवशी देखील तिच्यावर बलात्कार करण्यात आला. एकूण सात आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला. विशेष म्हणजे हे नराधम तिच्यावर तब्बल पाच दिवस बलात्कार करत होते अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या प्रकरणी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे. पुण्यात अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराची घटना लाजीरवाणी, संतापजनक असून या गुन्ह्यातील बहुतांश आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरीत आरोपींना अटक करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे. सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल याची संपूर्ण काळजी राज्य शासन घेईल. पुणे पोलिसांनी गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने तपासाची व आरोपींच्या अटकेची कारवाई केली असं ते म्हणाले.
माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पोलिसांना अधिक दक्ष राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गुन्ह्यातील रेल्वे कर्मचाऱ्यांचा सहभाग लक्षात घेता रेल्वे राज्यमंत्र्यांशी संपर्क साधून त्यांनाही अशा प्रवृत्ती रोखण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती करण्यात येईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- वानवडी बलात्कार प्रकरण : गृहविभागाचा राज्यात काडीचाही वचक राहिला नाही; चित्रा वाघ यांची टीका
- बूथरचना आणि पन्नाप्रमुख योजनेच्या जोरावर भाजपा आगामी निवडणुकात प्रचंड यश मिळवेल – पाटील
- अण्णासाहेब पाटील महामंडळाला तातडीने १०० कोटी रुपये द्या; नरेंद्र पाटील यांची मागणी
- ‘पुण्यातील घटनेचा निषेध; संबंधितांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी यासाठी राज्यसरकार प्रयत्न करेल’
- ईडीने हस्तक्षेप करणं एका अर्थानं राज्यांच्या अधिकारांवर गदा आणणं; शरद पवारांची टीका

