Share

काहीही झालं तरी मुस्लिमांना आरक्षण देणारच : कॉंग्रेस

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुस्लीम आरक्षणासंदर्भात ठाकरे सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. मुस्लीम बांधवांना आरक्षण देण्याबाबत महाविकास आघाडी सकारात्मक भूमिकेत आहे. शिवसेनेकडूनही आता मुस्लीम आरक्षणाला समर्थन देण्यात आलं आहे. त्यामुळे लवकरच राज्य सरकार मुस्लिमांना आरक्षण मिळवून देण्यासाठी कायदा करणार असल्याच मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

त्यानंतर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीदेखील आमचे सरकार मुस्लिमांना आरक्षण देणारच असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. संगमनेर येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याच्या चेअरमन व व्हाइस चेअरमन निवडणुकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना थोरात म्हणाले, ‘आघाडी सरकारने मुस्लीम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याबाबतचा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर आलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारने त्याचे विधेयकात रुपांतर करून कायदा करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही. आमचे सरकार कोर्टात टिकेल असे ओबीसी व मराठा समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मुस्लिमांना आरक्षण देणारच. हीच कॉंग्रेसची भूमिका आहे.

सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याचा महाविकासआघाडीचा प्रयत्न आहे. ठाकरे सरकार समाजाच्या हिताचे निर्णय घेईल, असे शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे एकूणच शिवसेनेचा मुस्लीम आरक्षणाला पाठिंबा असल्याचं सांगितलं जात आहे. मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण मिळावं ही मागणी गेल्या काही वर्षांपासून मुस्लीम समाज करतोय. आता यासाठी सनदशीर मार्गानं लढा उभारणार असल्यांच खासदार हुसैन दलवाई यांनी सांगितलंय.

दरम्यान, धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याची संविधानात तरतूद नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्यांना 10 टक्के आरक्षणाची घोषणा केली आहे. असं असतानाही राज्य सरकारने मुस्लीम आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. मात्र आमचा धर्माच्या आधारार आरक्षण देण्यास विरोध आहे,’ असं म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुस्लीम आरक्षणाच्या निर्णयावरून राज्य सरकारवर टीका केली आहे.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!