परभणी: राज्यात कृषी विद्यापीठातील बी.एस्सी. प्रथम, द्वितीय व तृतीय सत्राच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘प्रमोटेड कोविड-१९’चा शिक्का असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी असून शैक्षणिक वर्षाला ‘कोरोना’चा डाग लागल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याची आता कृषीमंत्री दादा भुसे यांनी गंभीर दखल घेतली आहे. तर राज्य शासनाचे असे कोणतेही आदेश नसताना ज्या विद्यापीठांनी गुणपत्रिकेवर ‘कोविड-१९ प्रमोटेड असा शिक्का दिल्याप्रकरणी संबंधित आदेश देणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेला निर्देश देण्यात आले आहेत.
अकोला कृषी विद्यापीठा अंतर्गत अमरावती कृषी विद्यालयामधील २४७ विद्यार्थ्यांना कोविड-19 असा उल्लेख असलेल्या गुणपत्रिका देण्यात आल्या होत्या. आता याप्रकरणी कृषी मंत्र्यांनी चौकशी आदेश दिले असून विद्यार्थ्यांना दिलेली प्रमाणपत्र परत घेऊन नवीन प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचं आश्वासन पालक आणि विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. तर विद्यार्थ्यांना कोविड-१९ प्रमोटेड अशा शिक्का देण्याचा निर्णय असा कोणत्याही कृषी विद्यापीठाने घेतला नसल्याचं परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी स्पष्ट केले आहे.
‘असल तो सिद्दी तर आम्हीबी हाय जिद्दी’; पाहा, अंगावर काटा आणणारा ‘जंगजौहर’चा टीझर
अमरावती येथील ज्या प्राचार्यांनी यावरील प्रतिक्रिया दिली आहे, त्यांना याप्रकरणी जाब विचारला जाणार असल्याचेही परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी सांगितले. तसेच या वृत्तावर कुणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन देखील कुलगुरू ढवण यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.राज्यातील चार कृषी विद्यापीठांमधील विविध शाखांच्या तृतीय सत्राच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर प्रमोटेड कोविड-19 असा शिक्का असणार असल्याची बाब समोर आल्यानंतर या वादाला तोंड फुटले.
आगरकरांच्या जयंतीला टिळकांचा फोटो, गोपीचंद पडळकर झाले ट्रोल
अनेक विद्यार्थी संघटनांनी याला विरोध दर्शवला. काहींनी तर न्यायालयात जाण्याचे भाष्य केले. तसेच गुणपत्रिकांवर कोविड-19 असा उल्लेख केला जाऊ नये या मागणीचा आग्रह भाजपकडूनही करण्यात येत होता. भाजप नेते आणि माजी शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी हा मुद्दा लावून धरला होता. यात कृषी, उद्यान विद्या, कृषी जैवतंत्रज्ञान, वनविद्या, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, कृषी अभियांत्रिकी अन्न तंत्रज्ञान या शाखांच्या विद्यार्थ्यांना ‘प्रमोटेड कोविड-१९’ गुणपत्रिका वितरित केल्या जातील असे वृत्त पसरले होते.
पृथ्वीपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावरून जाणार धुमकेतू,यानंतर सात हजार वर्षांनी घडणार अशी घटना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

