टीम महाराष्ट्र देशा:अध्यक्ष पद निवडीपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले ९३ वे अखिल भारतीय साहित्य संमेलनात आजही गोंधळ पाहायला मिळाला. ‘संत साहित्याचं आकलन न झाल्यामुळं बुवाबाजी वाढतेय का’ हा परिसंवाद सुरु असताना व्यासपीठावर गोंधळ सुरु झाला.
जगन्नाथ पाटील यांनी वक्त्याला थांबवून विषयाला आक्षेप घेत वाद घालायला सुरुवात केली. जगन्नाथ पाटील हे वेगळी भूमिका मांडायला व्यासपीठावर गेले असल्याची माहिती मिळते आहे,पण पाटलांना हिंदुत्ववादी कार्यकर्ते समजून त्यांच्याशी वाद घालायला काही कार्यकर्त्यांनी सुरवात केलीव वादाची ठिणगी पडली.
त्यानंतर पोलीस संमेलनस्थळी दाखल झाले. गोंधळामुळे थांबलेला परिसंवाद नंतर सुरु करण्यात आला. राजकीय परिघापासून दूर राहिलेल्या साहित्य संमेलनाला यामुळं वादाची किनार लागली आहे. यावेळी वार्तांकन करायला आलेल्या पत्रकारांना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आल्याचे देखील समजते आहे.
आयोजकांनी बाउन्सर बोलून कार्यक्रमात गोंधळ वाढवला, असे गोंधळ घालणाऱ्या आंदोलकांनी म्हटलं आहे.तर संमेलनात आधीही सोमेश कोलगे या मुंबई तरुण भारतच्या पत्रकाराला अटक करण्याचा प्रयत्न झाला होता.त्यामुळे संमेलनात पत्रकारांनी जाऊ नये का?हा प्रश्न ही या ठिकाणी उपस्थित होत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
