Share

‘अजून कोरोनाची दुसरी लाट संपलेली नाही’: भारती पवार

Published On: 

मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट कमी झाले असले तरी ते पूर्णपणे नाहीसे झालेले नाही. अजूनही कोरोनाच्या आजाराची भीती आहे. मात्र नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. याबाबत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी सांगितले की, ‘भारतात अजून दुसरी कोरोनाची लाट संपलेली नाही आहे. इतर देशात कोरोनाची तिसरी आणि चौथी लाट येऊन गेली आहेत त्यामुळे भारतात आपण यावरती लक्ष ठेवत आहोत’. केंद्र सरकार कोरोना रुग्णांची संख्या वाढत असेल तर तात्काळ त्या राज्याशी संपर्क साधून योग्य उपाय करत आहे. यावर पंतप्रधानचे लक्ष आहे. यासाठी लसीकरणावर देखील अधिक भर दिला जात आहे.

तसेच तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता मागील महिन्यात आपत्कालीन कोविड निधीसाठी २३ हजार कोटींचं पॅकेज सुद्धा देण्यात आले आहे. आणि महाराष्ट्रामध्ये त्याच वाटप झालेले आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात १ करोडपर्यंत औषध साठवणुकीसाठी त्यांना जागा देण्यात आली आहे, आयसीयू बेड, ऑक्सिजन प्लांटची सुविधा ही करण्यात आली आहे.

तसेच राज्याचे आरोग्यमंत्री यांनी कोरोना लसीचा एक डोस घेतलेल्या नागरिकांना दिवाळीपूर्वी नियमामध्ये शिथिलता देण्याचे संकेत दिले आहेत. त्यावर भारती पवार म्हणाल्या की तज्ज्ञांकडून अद्याप तरी एक डोस घेतलेल्यांना प्रवास, मॉल किंवा इतर कुठे जाण्यास परवानगी द्यावी अशा शिफारसी नसल्याचं सांगितलं.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!