Share

पृथ्वीराज चव्हाणांंच्या भूमिकेतून काँग्रेसचा हिंदू मंदिरांप्रतीचा आकस व दुजाभाव स्पष्ट दिसतोय

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी भारतात मागच्या ५० दिवसांपासून लॉकडाऊन घोषित केलेला आहे. अर्थव्यवस्था संकटात सापडलेली आहे. यावर उपाय म्हणून सरकारने ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने कर्जाने ताब्यात घ्यावे, असा सल्ला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे.

आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ही सूचना करताना, चव्हाण यांनी पीएमओ कार्यालयास मेन्शन केलं आहे.केंद्र सरकारने ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने कर्जाने ताब्यात घ्यावे. World Gold Concil च्या अंदाजानुसार देशात १ ट्रिलियन डॉलर (किंवा ७६ लाख कोटी रुपये) इतके सोने आहे. सरकारने हे सोने १ किंवा २ टक्के व्याजाने परतीच्या बोलीवर ताब्यात घ्यावे, अशी सूचना पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांच्या या पर्यायवर आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. महाराष्ट्र देशाशी बोलताना भाजपा युवा मोर्चा प्रदीप गावडे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या भूमिकेतून काँग्रेस चा हिंदू मंदिरांप्रतीचा आकस व दुजाभाव स्पष्ट होत आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले की, मूलतः देवाला सोनं दान करायची पद्धत फक्त हिंदूत आहे, इतर धर्मात नाही. धर्मादाय कायद्याप्रमाणे ज्या त्या सांप्रदायिक ट्रस्ट चे उत्पन्न त्या त्या संप्रदायासाठीच वापरायचे असते, कारण एका धर्मविशेष श्रद्धेपोटी ते दान दिलेले असते. हिंदू मंदिराचा पैसा हिंदूसाठीच वापरावा असा तर्क कायद्यातून निघू शकतो. त्याचबरोबर माननीय सर्वोच न्यायालयाने ही वारंवार सांगितले आहे की मंदिरांच्या प्रशासनाची जबाबदारी भविकांकडे द्यावी, सरकारने त्यात ढवळाढवळ करू नये.

देशात इतर धर्मियांची ही धार्मिक संपत्ती आहे पण त्याबाबत पृथ्वी बाबा बोलत नाहीत, उदा. इस्लामी धर्माचा पैसा मुख्यतः वक्फ बोर्डाच्या जमिनीत आहे आणि चर्च चा पैसा रियल इस्टेट मध्ये आहे, मंदिरांच्याच अनुषंगाने इस्लामी वक्फ बोर्डाच्या जमिनी सरकारने जप्त कराव्यात व चर्च ची रियल इस्टेट गहाण टाकावी असेही पृथ्वीराज चव्हाण का म्हणत नाहीत, फक्त मंदिरेच का ?? पृथ्वीराज चव्हाण यांच्या भूमिकेतून काँग्रेस चा हिंदू मंदिरांप्रतीचा आकस व दुजाभाव स्पष्ट होत आहे.

दरम्यान देवस्थानांची संपत्ती ताब्यात घेण्याचा अधिकार तुम्हाला दिलाच कोणी? असा सवाल करत भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक आचार्य तुषार भोसलेंनी चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, सरकारला देवस्थानांचं सोनं ताब्यात घेण्याचा अधिकार नसल्याचं म्हटलं आहे. ‘पृथ्वीराज चव्हाण, देवस्थानं खासगी मिळकत आहे का? त्यांच्या संपत्तीला ताब्यात घेण्याचा अधिकार तुम्हाला दिलाच कोणी? ज्यावेळी देवस्थानांना काही देण्याची वेळ होती तुम्ही मुख्यमंत्री होतात तेव्हा, तेव्हा तुमच्या हाताला लकवा मारला होता आणि देवस्थानांकडे संपत्ती मागण्यासाठी तेच हात पुढे करताना लाज वाटत नाही? असा सवाल भोसले यांनी उपस्थित केला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!