लातूर : मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा मुख्य मार्ग असलेला टेंभुर्णी – कुर्डुवाडी – बार्शी – येडशी हा आहे. हा महामार्ग लातूर, उस्मानाबाद व सोलापूर या जिल्ह्याला जोडणारा रस्ता आहे. या महामार्गाची स्थिती वाहतुकीस अनुकूल नसल्याने टेंभूर्णी-बार्शी मार्गावर दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत होते.
या पार्श्वभूमीवर २९ सप्टेंबर रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे लातूरचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मागणी केली होती. तसेच लातूर-मुरुड-ढोकी-येडशी-कुर्डुवाडी-टेंभुर्णी हा राष्ट्रीय महामार्ग मराठवाडयातून विदर्भाकडे तसेच पश्चिम महाराष्ट्र, पुणे, मुंबईला दळणवळण करणेकरीता वापरण्यात येतो, सद्यस्थितीत रस्त्याची दुरावस्ता होऊन अपघाताने जिवीत व वित्त हानी मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. या संदर्भात खासदारांनी २१ नोव्हेंबर २०१९ रोजी अधिवेशनात तारांकित प्रश्न देखील उपस्थित केला होता. अधिवेशन काळात हा रस्ता दुरुस्तीची मागणी करण्यात आली होती.
त्यानुसार लातूर- मुरुड- ढोकी- येडशी- कुर्डुवाडी- टेंभुर्णी ह्या राष्ट्रीय महामार्गासाठी ४९ कोटी १२ लाख तर बार्शी-येडशी-मुरुड-लातूर- सग्रोली ह्या महामार्गासाठी ३० कोटी २४ लाख असे एकूण ७९ कोटी ३६ लाखांचा निधी मंजुर झाला आहे. त्यामुळे आता या रस्त्याची दुरुस्ती झाल्यानंतर या भागातील नागरिकांना मोठी सुविधा होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :

