औरंगाबाद : घरातील सर्वजण झोपी गेलेले असतांना भर दिवसा घरात शिरुन कपाटातील पावणे पाच लाख रुपये किंमतीचे दागिने व रोख रक्कम चोरल्याप्रकरणी आरोपी रिक्षा चालकाच्या पोलीस कोठडीत १६ जूनपर्यंत वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी.डी. तारे यांनी सोमवारी दि.१४ दिले. बाबासाहेब ऊर्फ बाब्या ऊर्फ सोनु मोहन भगुरे (२२, रा. राजनगर, मुकुंदवाडी) असे आरोपीचे नाव आहे.
मुकुंदवडीतील सदाशिवनगरा राहणारे रमेश कोंडु तायडे (६२) यांनी फिर्याद दिली. त्यानूसार, ११ जून रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तायडे, त्यांची पत्नी व सुन असे तिघे झोपी गेले होते. संधी साधत चोरट्यांनी किचनच्या साईडच्या उघड्या दरवाजातून घरात प्रवेश करुन घरातील कपाटात पिशवीमध्ये ठेवलेले चार लाख ९५ हजार ४२३ रुपये किंमतीचे दागिने व एक हजार रुपयांची रोख रक्कम असा ऐवज चोरुन नेला. चार वाजेच्या सुमारास तायडे यांच्या पत्नीला जाग आली तेंव्हा घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. प्रकरणात मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास करुन पोलिसांनी १२ जून रोजी आरोपी भगुरे याला अटक त्याच्याकडून चोरीचा ऐवज जप्त केला. तसेच आरोपी भगुरे याने चोरलेल्या ऐवजापैकी एक अंगठी शहागंज येथे विक्री केल्याची कबुली दिली.
आरोपीच्या कोठडीची मुदत संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत १६ जूनपर्यंत वाढ केली. प्रकणात सहायक सरकारी वकील बालाजी गवळी यांनी काम पाहिले.
महत्त्वाच्या बातम्या
- शिवसेनेला भाजपची भीती वाटतेय की मित्रपक्षांवर भरोसा नाही ?
- रावसाहेब दानवेंच्या कार्यालयाची झाडाझडती, दोन अधिकाऱ्यांसह पाच पोलीस निलंबित
- WTC चा अंतिम सामना जिंकणाऱ्या टीमला मिळणार ‘एवढी’ रक्कम
- ‘या’ ठिकाणी दुसऱ्यांदा अतिक्रमणाचा प्रयत्न, मनपाच्या अतिक्रमण विभागाने हाणून पाडला!
- इशांत का सिराज, ‘विराट’प्रश्न ; सराव सामन्यात मिळालं उत्तर
- ‘धर्माच्या भावनांशी खेळू नका’; राम मंदिर घोटाळ्याच्या आरोपांवर शिवसेना खासदाराचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

