मुंबई : दोन दिवसापुर्वी २० जुन रोजी जगभरात फादर्स डे साजरा करण्यात आला यावेळी मान्यवरानी त्यांच्या वडिलांच्या आठवणीत फोटो सोशल मीडीयावर शेअर केले. तर काही खेळाडूंनीही आपल्या आपत्यासोबतचे काही फोटो शेअर केले.
जमैकाचा ऑलिम्पिक व विश्वविजेता दिग्गज धावपटु उसैन बोल्टने पण फादर्स डेच्या निमीत्ताने त्याच्या संपुर्ण कुटुंबाचा फोटो शेअर केला. या पोस्टमध्ये बोल्टने त्याच्या जुळ्या मुलांची माहिती शेअर केली व त्यांचे नावही चाहत्यांना सांगितले. एका मुलाचे नाव त्याने थंडर आणि दुसऱ्याचे नाव सेंट लिओ असे ठेवले. हे नाव ऐकुन त्याच्या चाहत्यानी सोशल मीडीयावर भन्नाट प्रतिक्रिया दिली. एका चाहत्याने ही दोन्ही नावे ऐकुन ‘घरात वादळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही, अभिनंदन, ‘ अशी प्रतिक्रीया दिली आहे.
https://www.instagram.com/p/CQWeB5dFGB0/
या दोन मुलांच्या आधी बोल्टला ऑलम्पिया नावाची एक मुलगी देखील आहे. मात्र बोल्टच्या या पोस्टमधुन त्याने मुलांची नावे ठेवताना त्यांचा विजेशी संबधीत नावे ठेवली आहे. ३४ वर्षीय उसैन बोल्टने २००८, २०१२ आणि २०१६ ऑलिम्पिक स्पर्धेत तब्बल आठ सुर्वण पदकांची कमाई केली. २०१७ साली निवृत्तीची घोषणा केल्यामुळे आगामी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत बोल्ट सहभागी होणार नाहीये.
महत्वाच्या बातम्या
- ‘सरकार पडेल त्या दिवशी अल्टरनेट देऊ’; देवेंद्र फडणवीसांचं महत्वाचं विधान
- ‘तुम्ही एकमेकांना जोडे मारा, हार घाला, पण जनतेचे हाल का?’; फडणवीस आक्रमक
- ‘पवारांच्या पे रोलवर राहून बाजू घेण्यापेक्षा सर्वसामान्य शिवसैनिकांच्या व्यथा मांडा’
- पंजाबमध्ये नवज्योत सिंह सिद्धू ‘या’ पक्षाचा असू शकतात मुख्यमंत्री पदाचा चेहरा
- ठाकरे सरकारचं ठरलं ! पावसाळी अधिवेशन दोन दिवसातच उरकणार


