Share

पाऊस आमच्या तालुक्यात पडतो; म्हणून पाण्यावर अगोदर आमचाच हक्क

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा :  आमच्या अकोले तालुक्यात सर्वात जास्त पाऊस पडतो म्हणून पाण्यावर अगोदर आमचा हक्क आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात अगोदर पाणी खेळले पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करणारच, असे विधान अकोले तालुक्याचे नवनिर्वाचीत आमदार डॉ. किरण लहामटे यांनी भंडारदरा येथील रंधा-धबधबा येथे आयोजित संक्रांत मेळाव्यात केले.

घोरपडा मातेच्या आशीर्वादाने आणि माझ्या आदिवासी जनतेच्या दिलेल्या प्रेमानेच मी अकोले विधानसभेत तालुक्याचे प्रतिनिधीत्व करीत आहे. म्हणूनच आज अकोले तालुक्यातील प्रत्येक माझा माणूस आमदार आहे. मी माझ्या जनतेशी कधीही गद्दारी करणार नाही असं त्यांनी ठासून सांगितले. जनतेच्या विश्वासाला कोठेही तडा जाऊ देणार नाही, आणि जनतेला योग्य तो न्याय देण्याची जबाबदारी माझ्यावर आहे ,अशी प्रतिक्रिया अकोले  आमदार डॉ. किरण लहामटे यावेळी यांनी दिली .

या मेळाव्यात आमदार लहामटे यांनी अकोले तालुक्याच्या माजी लोकप्रतिनिधींवर चांगलेच तोंडसुख घेतले. आदिवासी समाजात घुसखोरी ही माजी आदिवासी मंत्र्यांच्याच कालावधीत झाल्याचे ते बोलले. तसेच आपल्या तालुक्यात सर्वात जास्त पाऊस पडतो म्हणून पाण्यावर अगोदर आमचा हक्क आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात अगोदर पाणी खेळले पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करणारच, असेही ते म्हणाले.

तसेच येत्या काळात कोणत्याही परिस्थितीत अकोले तालुक्यात एमआयडीसी आणणारच, असा शब्द त्यांनी यावेळी अकोलेकरांना दिला. तालुक्यातील जनतेने ठरवलं तर काय होतं याचा प्रत्यय गेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने दाखवून दिले आहे अशी लहामटे म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!