🕒 1 min read
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळाच्या एकाही सभागृहाचे सदस्य नाहीत. येत्या २८ मे पर्यंत त्यांना याची पूर्तता करावी लागणार आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्यपाल कोट्यातील विधान परिषदेच्या रिक्त जागेवर उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करण्यात यावी, असे प्रयत्न महाविकास आघाडीकडून केले जात आहेत.
मात्र यावर माजी खा. निलेश राणे यांनी खिल्ली उडवली आहे. अगोदर आमदार मुख्यमंत्री झाल्यावर अभिनंदन करायचे आता मुख्यमंत्री आमदार झाल्यावर अभिनंदन करायची पाळी आली. अगोदर मुख्यमंत्री आमदार निवडून आणायचे आताच्या मुख्यमंत्र्याला स्वतः आमदार होता येत नाही आहे, अशी खोचक टीका निलेश राणे यांनी केली आहे. ही टीका त्यंनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून केली आहे.
अगोदर आमदार मुख्यमंत्री झाल्यावर अभिनंदन करायचे आता मुख्यमंत्री आमदार झाल्यावर अभिनंदन करायची पाळी आली. अगोदर मुख्यमंत्री आमदार निवडून आणायचे आताच्या मुख्यमंत्र्याला स्वतः आमदार होता येत नाही आहे.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) April 30, 2020
याआधी ही निलेश राणे यांनी मुख्यमंत्री हे कोरोनाच्या संकटात बाहेर पडत नाहीत केवळ फेसबुक लाईव्ह द्वारे उपदेश देत आहेत, अशी टीका केली होती. ज्याप्रमाणे आरोग्य मंत्री राजेश टोपे कोरोनाबाबत आढावा घेताना दिसत आहेत. मात्र मुख्यमंत्री दिसत नाहीत, असा टोला निलेश राणे यांनी लगावला होता.
आज महाराष्ट्रातले बाबा चुरणदास परत फेसबुक लाईव्ह वर आले होते असं कळलं. परत फुस्क प्रवचन देऊन गेले, दिलं काही नाही. मुख्यमंत्री म्हणून किती ठिकाणी गले हे अगोदर जाहीर करा. जसे राजेश टोपे वेगवेगळ्या ठिकाणी दिसतात तसे मुख्यमंत्री का दिसत नाही???
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) April 26, 2020
दरम्यान उद्धव ठाकरे यांना विधानपरिषदेवर आमदार करण्यासाठी मोठे प्रयत्न सुरु आहेत. महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. यावेळी या नेत्यांनी राज्य संकटात आहे, अशावेळी मुख्यमंत्र्यांना तातडीने सदस्य करून घ्यावे, अशी विनंती केली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
