🕒 1 min read
NCP | मुंबई : शरद पवार यांच्या बाबतीत खोट बोलून किंवा रेटून बोलून ही राजकीय रणनीती भारतीय जनता पार्टीने आणि शिंदे गटाने स्वीकारलेली दिसते. ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांना शरद पवार किती माहित आहेत हे मला माहित नाही. परंतु त्यांना मला सांगायच आहे की शरद पावरांनी सामान्य माणसाला दैवत समजून त्याच्या हितासाठी काम केले आहे. या सगळ्या कामामुळे शरद पवारांना बुआ बाजी करण्याची आवश्यकता नाही पडली किंवा कोणते नवस करण्याची आवश्यकता देखील नाही पडली, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी लगावला आहे.
“आज इतिहासाचे खोटे दाखले देऊन पवारांवर टीका करायची हे राजकीय षड्यंत्र भाजप आणि शिंदे गट करत आहे. परंतु माझी विनंती आहे की शिंदे गटातील लोकांना राज्यपालांनी घेतलेली भूमिका तुम्हाला मान्य आहे?, त्रिवेदी काय म्हणाले ते तुम्हाला मान्य आहे?, मंत्री लोढा काय म्हणाले हे तुम्हाला मान्य आहे का?, यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील मंत्री, प्रवक्ते काहीच बोलायला तयार नाहीत”, असे महेश तपासे म्हणाले.
नरेश म्हस्के काय म्हणाले होते –
“अंधारे बाई तर कहरच करतात. निष्पापांच्या घरावर डल्ला मारणाऱ्या रौताला गुन्ह्यात अटक झाल्यावर त्याच्या आईची तुलना जिजाऊशी करतात यात शिवरायांचा अपमान नाही? हजारो हिंदू यमसदनी धाडले त्याच टिपू सुलतानाचे नाव यांनी पालिकेच्या मैदानाला दिले. यात शिवरायांचा अपमान नाही?.”
उद्धव ठाकरेंचा एक पोपट राऊत. दम तर तसा काहीच नाही भाऊत. पण शिवरायांच्या वंशजांना पुरावे मागतो. रक्तातल्या शिवाजींना सिद्ध करा म्हणतो. हा शिवरायांचा अपमान नाही का? शरद पवार म्हणतात, शिवरायांना जाणता राजा म्हणायची काहीच गरज नाही. यात शिवरायांचा अपमान नाही? भ्रष्टवादींच्या गजभियेंना महाराज बनून ऐऱ्या गैऱ्याला मुजरा घालताना शरम वाटत नाही? यात शिवरायांचा अपमान नाही?, असा सवाल नरेश म्हस्के यांनी उपस्थित केला होता.
महत्वाच्या बातम्या :
- Chandrakant Patil | उदयनराजेंना माझी हात जोडून विनंती, ‘हा’ विषय संपवा – चंद्रकांत पाटील
- Jubin Nautiyal | प्रसिद्ध गायक जुबिन नौटियालचा अपघात; इमारतीच्या जिन्यांवरून पडल्याने जखमी
- Sushma Andhare | “मी माझा भावाच्या भेटीला आली”, सुषमा अंधारे यांची शिंदे गटातील ‘या’ नेत्यावर टीका
- Sanjay Raut | “दिवार सिनेमाप्रमाणे शिंदे गटाच्या कपाळावर गद्दार लिहिलंय, त्यांच्या पोराबाळांना…”; संजय राऊतांचा हल्लाबोल
- BJP on Uddhav Thackeray | सत्तेसाठी हपापलेले उद्धव ठाकरे, अजून किती गद्दारी करणार ; भाजपची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
