नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसावर 2020 च्या अखेरपर्यंत निर्बंध घालत असल्याची घोषणा केली आहे. 24 जूनपासून हा आदेश लागू होणार आहे. करोना महामारीमुळे अमेरिकेला मोठा फटका बसला असून लाखो जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे अमेरिकी लोकांना प्राधान्य देत त्यांच्या मदतीसाठी ट्रम्प प्रशासनाकडून हे पाऊल उचलण्यात आलं आहे.
शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक; आमदारांच्या मागण्यांवर चर्चा
H-1B व्हिसावर निर्बंध आणल्यामुळे अमेरिकेत जायचं स्वप्न बघणाऱ्या भारतीयांना मात्र मोठा झटका बसलाय. भारतातून मोठ्या संख्येने आयटी प्रोफेशनल H-1B व्हिसा घेऊन अमेरिकेत जातात. याचा फटका अनेक भारतीय आणि अमेरिकी कंपन्यांनाही बसेल, ज्या कंपन्यांना 1 ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या आर्थिक वर्ष 2021 साठी अमेरिकी सरकारकडून H-1B व्हिसा जारी करण्यात आले होते त्यांना याचा फटका बसणार आहे.
करोना संकटामुळे अमेरिकेत वाढत्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर H-1B व्हिसावर निर्बंध आणण्याची मागणी होत होती. त्यानुसार ट्रम्प प्रशासनाने H-1B व्हिसासह अन्य अनेक श्रेणीतील व्हिसासाठीही निर्बंध आणले आहेत.
नाशिकमधील ठक्कर डोम येथे ५०० बेडचे कोविड केअर सेंटर उभारले जाणार
दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत मोदी-ट्रम्प मैत्रीचा देशाला फायदा होत नसल्याचा आरोप केला आहे. H-1B व्हिसा कार्यक्रम रद्द करण्याचा डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा निर्णय निराशाजनक आहे. व्हिसाधारक व नूतनीकरण करणाऱ्यांना याचा फटका बसणार नाही,अशी मी अपेक्षा करतो.आज ‘जागतिक नेते’ वैयक्तिक मैत्रीच्या गोष्टी करत असताना या मैत्रीचा देशाला काहीही फायदा होत नसल्याचं आपण सध्या अनुभवतोय. अस ट्विट करत रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
#H1B व्हिसा कार्यक्रम रद्द करण्याचा @realDonaldTrump प्रशासनाचा निर्णय निराशाजनक आहे.व्हिसाधारक व नूतनीकरण करणाऱ्यांना याचा फटका बसणार नाही,अशी मी अपेक्षा करतो.आज 'जागतिक नेते' वैयक्तिक मैत्रीच्या गोष्टी करत असताना या मैत्रीचा देशाला काहीही फायदा होत नसल्याचं आपण सध्या अनुभवतोय.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 23, 2020
तर, ट्रम्प यांच्या या निर्णयावर जगप्रसिद्ध सर्च इंजिन असणाऱ्या गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. ‘ट्रम्प प्रशासनाने घेतलेला निर्णय योग्य नाही. यामुळे इमिग्रेशनमुळे अमेरिकेला आर्थिक फायदा झाला आहे यामुळे अमेरिका ग्लोबल टेक लीडर बनला आहे. मी या निर्णयामुळे निराश आहे.’ ते पुढे म्हणाले,’आम्ही विदेशी प्रवासीयांच्या बाजूने उभे आहोत. येत्या काळात त्यांना प्रत्येक ठिकाणी संधी उपलब्ध करून देण्याही प्रयत्न करू.’ अस ट्विट सुंदर पिचाई यांनी केलं आहे.
Immigration has contributed immensely to America’s economic success, making it a global leader in tech, and also Google the company it is today. Disappointed by today’s proclamation – we’ll continue to stand with immigrants and work to expand opportunity for all.
— Sundar Pichai (@sundarpichai) June 22, 2020
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

