दिल्ली : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून अयोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोडी आणि त्यांचे केंद्र सरकार सध्या ही कोरोनाची परीस्थिती हाताळण्यास अयशस्वी ठरत आहे असा आरोप सातत्याने केला जात आहे. असतच आता आग्र्यामध्ये एका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हा काही साधासुधा स्वयंसेवक नव्हता तर ज्याला ट्विटरवर खुद्द भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी फॉलो करत होते, असा हा स्वयंसेवक होता. इतकेच नव्हे, तर मोदींचा कट्टर चाहता असलेल्या या स्वयंसेवकाने आपल्या कारच्या मागे मोदींचा मोठा फोटो देखील लावला होता.

कोरोनाग्रस्त झालेल्या या स्वयंसेवकाचं नाव अमित जयस्वाल असं होतं. कोरोनाने त्याचा मृत्यू होण्यापूर्वी त्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना मदतीचं आवाहन केलं होतं. मात्र, त्याचं ते आवाहन निष्फळच ठरलं. खुद्द नरेंद्र मोदी फॉलो करत असणाऱ्या अमितला मोदींकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळू शकली नाही. आणि सरतेशेवटी त्याला आपले प्राण गमवावे लागल्याची घटना घडली आहे. कोरोना संक्रमित झाल्यानंतर त्याच्यासाठी बेड मिळवण्यासाठी कुंटुबिय झटत होते. त्यासाठी त्यांनी थेट ट्विटरवर ट्विट करत मोदींना टॅग करत आवाहनही केले होते.
जयस्वाल यांचं कुटुंब स्वत:ला नेहमी मोदी भक्त म्हणवून घेत आलं आहे. जयस्वाल यांनी ट्विटरवर आपल्याला खुद्द नरेंद्र मोदी फॉलो करत असल्याचं अभिमानाने लिहलं होतं. त्यामुळे कोरोनाच्या या संकटामध्ये मोदी नक्कीच आपल्याला मदत करतील असा विश्वास त्यांच्या कुटुंबियांना होता. परंतु त्यांचे सगळे प्रयत्न निष्फळ ठरले. आणि दुर्दैवाने अमित जयस्वाल याचं कोरोनाने निधन झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अहिल्यादेवी होळकरांची तुलना ममता बॅनर्जींशी करणाऱ्या संजय राऊतांनी जनतेची माफी मागावी! जय मल्हार सेनेची मागणी
- मुंबई महापालिकेने काढले लसीसाठी ग्लोबल टेंडर, १ कोटी डोसची केली मागणी
- SRPF जवानांच्या बदलीसाठी १५ वर्षांची अट रद्द, आदित्य ठाकरेंच्या प्रयत्नांना यश !
- पवित्र रमजानचा सण साध्या पध्दतीने साजरा करा! अब्दुल सत्तार यांचे मुस्लिम बांधवांना आवाहन
- राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला ‘ब्रेक’; राजेश टोपेंची माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

