Share

फायबरने परिपूर्ण : बहुगुणी रताळे

Published On: 

🕒 1 min read

वेब टीम– रताळ्यामध्ये फायबरचे प्रमाण मुबलक असल्याने वेळी-अवेळी लागणार्या भूकेवर नियंत्रण मिळवणे शक्य होते. फायबरमुळे रताळं खाल्ल्यानंतर खूप वेळ पोट भरलेले राहते तसेच भूकेवरही नियंत्रण मिळवता येते. एक मध्यम आकाराच्या रताळ्यामध्ये सुमारे चार ग्राम फायबर असते. म्हणूनच उपवासाच्या दिवसाव्यक्तिरिक्त ऐरवी रताळ्याचा आहारात समावेश करा.

रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते :
रताळ्यामध्ये कार्ब्सचे प्रमाण अधिक असले तरीही त्यामधून शरीराला adiponectin नामक रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणार्या हार्मोन्सला चालना देण्याचे काम करते. असे Cochrane Database of Systematic Reviews जर्नलचे मत आहे. रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवल्यानंतर भूकेवर आणि अरबट चरबट खाण्याच्या इच्छेवरही नियंत्रण मिळवता येते. रताळ्यामध्ये ग्ल्यासमिक इंडेक्स कमी असल्याने रक्तातील साखर झटकन वाढत नाही. त्यामुळे तळण्याऐवजी, भाजण्याऐवजी रताळं वाफवून आहारात घ्यावे.

नैसर्गिकरित्या गोड असते :
रताळं नैसर्गिकरित्या गोड असल्याने हा लो-कॅलरी गोडाचा उत्तम पर्याय आहे. हेल्दीफाय मी च्या मते, एका मध्यम आकाराच्या रताळ्यामधून सुमारे 30 कॅलरीज मिळतात. तुमची गोड खाण्याची इच्छा पूर्ण करायची असल्यास रताळ्याचं कस्टर्ड हा एक उत्तम पर्याय आहे. यामुळे कमरेचा वाढता घेर आटोक्यात राहण्यास मदत होते. सोबतच रताळ्यामध्ये व्हिटामिन ए मुबलक आढळते. परिणामी रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!