Share

‘अडचण फक्त एकच, मला भांडण्याचा अभिनय करता येतो; आयुष्मानच्या या टीझरला चाहत्यांची पसंती

Published On: 

मुंबई : रोमॅण्टिक तर कधी विनोदी भूमिकांमधून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारा  अभिनेता आयुष्मान खुरानाने आजवर हटके भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्याच्या आगामी प्रोजेक्टमध्ये एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दरम्यान आयुष्मानच्या आगामी सिनेमाची नुकतीच घोषणा झाली आहे. हा सिनेमा रोमॅण्टिक किंवा विनोदी नसून हा पूर्णपणे अक्शन सिनेमा असणार आहे. या सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर रिलिज करण्यात आला आहे. या सिनेमाचं नाव ‘अक्शन हीरो’ असं असून आयुष्मान या सिनेमात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. आयुष्मानाने सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केलाय. या टीझर शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘अडचण फक्त एकच आहे की मला भांडण्याचा अभिनय करता येतो…भांडता येत नाही…काही तरी वेगळं करण्यासाठी खूप उत्साही आहे.’ अशा आशयाचं कॅप्शन त्याने दिलंय. आयुष्मानच्या टीझरला त्याच्या चाहत्यांनी पसंती दिलीय.

https://www.instagram.com/p/CUy8RDmIZN0/?utm_medium=copy_link

या नव्या सिनेमाचा टीझर पूर्णपणे अनिमेटेड असल्याचं दिसतंय. या बॅकग्राउंडला फक्त आयुष्मानचा आवाज ऐकू येतोय. पहिल्यांदाचा आयुष्मानाचा अक्शन अंदाज या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘अक्शन हीरो’ हा सिनेमा २०२२ सालामध्ये रिलीज होणार असून शूटिंग भारतासह इंग्लडमध्ये होणार आहे. अनुरुद्ध अय्यर या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. आगामी चित्रपटाची चाहत्यांना मात्र उत्सुकता लागली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!