Share

अजब सरकारचा गजब कारभार….एवढ्या मोठ्या पुण्यात फक्त २६ शिवभोजन केंद्र

Published On: 

🕒 1 min read

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आजपासून आणखी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. या कठीण काळात हातावर पोट असलेल्या गरिबांची उपासमार होऊ नये म्हणून शिवभोजन थाळीच्या माध्यमातून एक महिनाभर रोज जवळपास 2 लाख थाळ्या भोजन मोफत दिलं जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

कोरोना काळात मजुर, कामगार, शेतकरी वर्गासह सर्वसामान्य जनतेला शिवभोजन थाळी मोठा आधार देत आहे. राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांमुळे सर्व हॉटेल, रेस्टॅारंट यांना पार्सल सुविधा देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत त्यामुळे आता शिवभोजन केंद्रावर देखील शिवभोजन थाळी ही पार्सल स्वरूपात उपलब्ध होणार आहे.

दरम्यान, योजना अत्यंत चांगली आहे,त्यामागील सरकारचा उद्देश देखील चांगला आहे. याबाबत कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही मात्र मोठ्या शहरांमध्ये शिवभोजन थाळी केंद्रांची संख्या खूपच कमी असल्याने काहीशी नाराजी पाहायला मिळत आहे. पुणे शहराची लोकसंख्या 40-50 लाखांच्या आसपास आहे. लोकसंख्या 40-50 लाखांच्या आसपास असणाऱ्या या शहरात केवळ 26 शिवभोजन थाळी केंद्र असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पुण्याला लागुनच असणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्ये देखील अशीच परिस्थिती असल्याचे दिसून येत आहे.

पुणे आणि परिसरात अनेक उद्योगधंदे असल्याने तसेच अनेक विकासकामे सुरु असल्याने शहरात राहणाऱ्या मजुरांची संख्या देखील प्रचंड मोठी आहे. उच्चभ्रू लोकांच्या सोबतच शहरात हातावर पोट असणारे गोरगरीब देखील मोठ्याप्रमाणावर आढळून येतात. यातच राज्यासह शहरात देखील संचारबंदी लागू करण्यात आली असून जेवणाचा प्रश्न निर्माण झालेल्या अनेकांसाठी शिवभोजन थाळी हे वरदान ठरू शकते असा अंदाज आहे.मात्र पुणे शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत शिवभोजन थाळी केंद्रांची संख्या फारच कमी असल्याचे दिसून येते आहे असे कामगार प्रथमेश पेरला म्हणाले.

पुण्यात कुठे मिळणार शिवभोजन थाळी?

श्री स्वामी समर्थ कृपा स्नॅक्स सेंटर, बुधवार पेठ,कात्रज कॉर्नर,एस. कुमार वडेवाले, शुक्रवार पेठ, श्री स्वामी समर्थ टी अँड स्नॅक्स, मार्केटयार्ड, के जी गुप्ता अँड सन्स स्नॅक्स, स्वारगेट बस डेपो, श्री स्वामी समर्थ स्नॅक्स अँड टी हाऊस, फॅमिली कोर्ट, हॉटेल हृदयसम्राट, बिबवेवाडी, हॉटेल कप्तान, मांजरी, ग्रीन पॅलेस रेस्टोरंट, बुधवार पेठ,हॉटेल समाधान, मार्केटयार्ड,महात्मा फुले मंडई, मंडई,पुणे महानगरपालिकेतील हॉटेल निशिगंधा, शिवसमर्थ भोजनालय, हडपसर गाडीतळ, हॉटेल साईनाथ व्हेज, पुणे-सातारा रोड, हॉटेल कोल्हापुरी तडका, थिटे वस्ती, खराडी, हॉटेल यशोदा, घोरपडी, प्रतिभा महिला प्रतिष्ठान, औंध,सागर रेस्टोरंट, धानोरी.

पिंपरी-चिंचवड –

क्वालिटी केटरर्स, वायसीएम रुग्णालय,माऊली इंटरप्राइजेस, वल्लभनगर एसटी स्टॅन्ड, साई सेवा इंटरप्राइजेस, पिंपरी-चिंचवड महापालिका कँटीन श्री गणेश स्वीट्स अँड भोजनालय, संभाजीनगर, चिंचवड, श्री प्रसाद फूड हॉस्पिटॅलिटी अँड भोजनालय, सांगवी, सुनेत्रा महिला बचत गट, मनपा व्यापारी संकुल, चिंचवड,एकत्व फार्मर प्रोड्युसर कंपनी, आकुर्डी रेल्वे स्टेशन.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!