पुणे : कोरोना व्हायरस चा धोका वाढला असून कालपर्यंत ८ कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह असताना आता त्यात अजून एका कोरोनाग्रस्ताची त्यात वाढ झाली आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ९ झाली आहे. तर महाराष्ट्रात आता कोरोना बाधितांची संख्या 12 झाली आहे.
विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी याबाबत माहिती दिली. ‘ १ मार्च रोजी दुबईहून पुण्यात आलेल्या एका दांपत्याला प्रथम कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे उघड झालं. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या आणखी काही जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सिद्ध झाले. तर आज सापडलेला रुग्ण अमेरिकेहून नुकताच पुण्यात आला आहे. त्याची तपासणी 11 मार्च रोजी तपासणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. मात्र या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, राज्यभरात पुण्यात ९ मुंबईत 2 आणि नागपूरमध्ये 1 रुग्ण कोरोनाबाधित आहे. याशिवाय संशयित रुग्णांची संख्या राज्यभरात वाढली आहे. तर मराठवाड्यातही काही जिल्ह्यांमध्ये कोरोना संशयित आढळले आहेत. त्यांच्यात लक्षणं दिसल्यामुळे आणि परदेशातला प्रवास लक्षात घेऊन त्यांचं विलगीकरण करण्यात आलं आहे. कोरोनाच्या चाचणीसाठी त्यांचे स्वॅब लॅबमध्ये देण्यात आले आहेत. या सर्व संशयितांचे रिपोर्ट अद्याप प्रतीक्षेत आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
