मुंबई : राज्यातील कोरोनामुक्त होणाऱ्यांचा आकडा व टक्केवारी जरी वाढताना दिसत असली तरी राज्यात नव्या रुग्ण वाढीचा आकडा देखील दहा हजार पारचं असल्याचे काल दिवसभरातल्या आकडेवारीनुसार समजते. दरम्यान, राज्याची कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी ७१.१४ टक्क्यांवर गेली आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल राज्यात ११ हजार ११९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर, ९ हजार ३५६ रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात एकूण रुग्णांची संख्या ६ लाख १५ हजार ४७७ वर गेली आहे. तसेच, दिवसभरात ४२२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. राज्यातील एकूण ऍक्टिव्ह रुग्ण संख्या आता १ लाख ५६ हजार ६०८ असून आता पर्यंत ४ लाख ३७ हजार ८७० रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. एकूण कोरोना बळींची संख्या २० हजार ६८७ वर गेली आहे.
एसटी महामंडळ लवकरच पेट्रोल पंप सुरु करणार ; परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती
देशात, २७ लाख २ हजार ७४३ वर एकूण कोरोनाबाधितांचा आकडा गेला असून काल दिवसभरात ५५ हजार ७९ नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात एकूण ८७६ मृत्यू झाले असून देशात एका दिवसात रुग्ण बऱ्या होणाऱ्यांच्या आकड्याने उच्चांक गाठला. गेल्या २४ तासांत ५७ हजार ५८४ हुन अधिक रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे जवळपास एकूण २० लाख रुग्णांनी देशात कोरोनावर मात केल्याचे समोर येत आहे.
सिमेंट व रस्तेनिर्मितीसाठी करणार उत्सर्जित राखेचा वापर – ऊर्जामंत्री नितीन राऊत


