नुकताच दिल्लीत कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये पुण्यातील सरहद संस्थेतर्फे संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात रॉचे माजी प्रमुख आणि संत नामदेव राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी अमरजीत सिंह दुल्लत यांनी एक खळबळजनक वक्तव्य केले आहे.
मरजीत सिंह दुल्लत म्हणाले, देशाचा पुढचा पंतप्रधान शीख नाही बनला तर मराठा जरूर बनेल. या सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित राहणार होते, त्यांच्या हस्ते पुरस्कार दिला जाणार होता. मात्र त्यांना काही कारणाने उपस्थिती लावता आली नाही. या सोहळ्यात मेघालयचे राज्यपाल सत्यपाल सिंह मलिक आणि राँ चे माजी प्रमुख अमरजित सिंह दुलत यांना संत नामदेव पुरस्कार दिला गेला.
या विधानानंतर माध्यमांमध्ये बरीच चर्चा होत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
