मुंबई : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज (१५ नोव्हेंबर) पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी निधन झाले. ते १०० वर्षाचे होते. त्यांच्या निधनाची माहिती दीनानाथ मंगशेकर रूग्णालयाच्या प्रशासनाने दिली आहे. मागील काही दिवसांपासून त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगशेकर रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपाचार सुरू होते. शिवशहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधानानंतर भाजपनेत्या खासदार प्रितम मुंडे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
याबाबत प्रितम मुंडे यांनी ट्विट केले आहे. त्या म्हणाल्या, पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाची वार्ता दुःखद आहे. आपल्या ओजस्वी वाणीतून त्यांनी इतिहासाला जिवंतरूप दिले, सोबतच छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र्य घराघरात पोहोचवण्याचे महत्कार्य ही त्यांनी केले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!! असे प्रितम मुंडे म्हणाल्या.
पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाची वार्ता दुःखद आहे.
आपल्या ओजस्वी वाणीतून त्यांनी इतिहासाला जिवंतरूप दिले,सोबतच छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र्य घराघरात पोहोचवण्याचे महत्कार्य ही त्यांनी केले।
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!!
— Dr. Pritam Munde (@DrPritamMunde) November 15, 2021
‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथाचे लेखक, ‘जाणता राजा’ या महानाट्याचे लेखक-दिग्दर्शक शिवशाहीर महाराष्ट्रभूषण बळवंत मोरेश्वर पुरंदरे म्हणजेच बाबासाहेब पुरंदरे यांचा २९ जुलै २०२१ रोजी १०० वा वाढदिवस झाला.
दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिरीष याडकीकर यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, आदरणीय पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचे रुग्णालयात उपचार घेत असताना वृद्धापकाळाने आज दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ५ वाजून ०७ मिनिटांनी दु:खद निधन झाले. त्यांचे पार्थिव सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी त्यांच्या पर्वती येथील निवासस्थानी नेण्यात येईल. अंत्यसंस्कार सकाळी १० वाजता वैकुंठ स्मशानभूमीत केले जातील.
महत्वाच्या बातम्या
- अन्यायाविरोधात लढणाऱ्यांना नक्षलवादी म्हणता येणार नाही- शरद पवार
- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन
- …त्यांचे जाणे अत्यंत वेदनादायी- नितीन गडकरी
- प्रत्येक घराघरात शिवचरित्र पोहाचवण्यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले- उदयनराजे भोसले
- गोखलेंच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘शिवसेनेसोबत युती…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

