Share

सर्वाधिक पसंतीस उतरलेल्या ‘या’ गाड्या 3 लाख रुपयांपेक्षा स्वस्त

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्लीः नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी वाहन खरेदी केली. अद्याप देखील ही विशेष वाहन खरेदी सुरूच आहे. यामध्ये ग्राहकांचा ऑफर आणि डीस्कउंट मध्ये वाहन खरेदी करण्याकडे कल असतो. तर आता अशीच संधी ग्राहकांना आणली आहे. त्यामुळे आता कमी बजेटमध्ये कार खरेदी करता येणार आहे.

या कारमध्ये डॅटसन रेडी-गो आणि मारुती सुझुकी अल्टोचा समावेश आहे. आम्ही आपल्याला या दोन्ही कारचे इंजिन, परफॉर्मन्सबद्दल सांगणार आहोत. याशिवाय आम्ही त्यांच्या किमतींबद्दलही माहिती देणार आहोत. यानंतर आपण स्वत: ला ठरवू शकता की तीन लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत कोणती कार आपल्यासाठी सर्वोत्तम असेल.

भारतीय बाजारपेठेमध्ये डॅटसन रेडी-गोची सुरुवातीची किंमत दिल्लीची एक्स-शोरूममध्ये 2.86 लाख रुपये आहे, जी त्याच्या वरच्या टॉपच्या मॉडेलवर 4.82 लाखांवर गेली आहे. तर इंजिन 0.8- लिटर आणि 1- लिटर इंजिनमध्ये विक्रीस उपलब्ध आहे.डॅटसन रेडी-गोचे 0.8-लिटर इंजिन 5678 आरपीएम वर 54 पीएस पॉवर आणि 4386 आरपीएमवर 72 एनएम टॉर्क तयार करते. त्याच वेळी रेडी-गोचे 1 लिटर इंजिन 5500 आरपीएम वर 68 पीएस पॉवर आणि 4250 आरपीएम वर 91 एनएम टॉर्क तयार करते. त्याचे इंजिन 5-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनने सुसज्ज आहे.डॅटसन रेडी-गोचे 0.8-लिटर इंजिन 5 स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशनसह सुसज्ज आहे. त्याच वेळी, त्याचे 1-लिटर इंजिन 5-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनने सुसज्ज आहे.

मारुती सुझुकी अल्टोची दिल्लीची एक्स-शोरूम किंमत 2.99 लाख रुपये आहे. तर इंजिन शक्तीसाठी 796 सीसी, 3-सिलेंडर, 12-वाल्व, बीएस -6 कम्प्लायंटचं इंजिन आहे. त्याच्या पॉवर परफॉर्मन्सबद्दल बोलायचं झाल्यास त्याचे इंजिन 6000 आरपीएम वर 48PS ची जास्तीत जास्त पॉवर आणि 3500 आरपीएम वर 69 एनएमची पीक टॉर्क तयार करते. ऑल्टो इंजिन 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनने सुसज्ज आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!