Share

कोल्हापूरचे मंत्री नगर जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आणि जिल्ह्याचा कार्यक्रम झाला; राम शिंदेंची मुश्रीफांवर टीका

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- महाविकास आघाडी सरकारमध्ये नगर जिल्ह्यातील तीन मंत्री असताना देखील कोल्हापूरचे मंत्री नगर जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. त्यामुळेच नगर जिल्ह्याचा कार्यक्रम झाला असून कोणाचेच कुठेच लक्ष नाही, असा घणाघात माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केला आहे. पक्षाच्या एका बैठकीसाठी माजी मंत्री शिंदे हे काल नगरला आले होते. यावेळी ते बोलत होते.

शिंदे पुढे म्हणाले की, अतिवृष्टीने लोकांच्या पिकांचे नुकसान झाले, त्याचे पंचनामे व्यवस्थित झाले नाही. अशा प्रकारचे अनेक प्रश्न जिल्ह्यात निर्माण झाले आहेत. जिल्ह्यामध्ये पालकमंत्री येत नाहीत. मी पालकमंत्री होतो, तेव्हा जिल्ह्यात सर्व तालुक्यात पोहोचत होतो. माझ्या कालखंडात केव्हाही पालकमंत्री विरोधात किंवा पालकमंत्री पोहोचले नाहीत, अशा तक्रारी आल्या नव्हत्या. मात्र नगर जिल्ह्यात महाविकास आघाडी सरकारमधील तीन मंत्री असताना देखील येथे बाहेरून कोल्हापूरचे मंत्री पालकमंत्री म्हणून नियुक्त केले गेले. त्यामुळे जिल्ह्याचा कार्यक्रम झाला असून कोणाचे कोठेच लक्ष नाही, अशी परिस्थिती आहे, असा आरोपही प्रा.शिंदे यांनी केला आहे.

महाविकास आघाडीत काँग्रेस हा एक पक्ष असून त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जिल्ह्यातील मंत्री आहेत. मात्र बाळासाहेब थोरात यांच्या तालुक्यात पोलिसाला लाच घेताना रंगेहाथ पकडल्याची घटना घडली. त्यामुळे जिल्ह्यात पोलीस प्रशासनात नेमके चाललंय काय? त्यावर कोणाचे लक्ष आहे का नाही? असे प्रश्नही निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी थोरात यांनी यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे. तसेच नगर जिल्ह्याने अनेक दिग्गज नेतृत्व दिले आहेत. अशा परिस्थितीत बाहेरच्या जिल्ह्याचा पालकमंत्री नियुक्त करणे, यावर महाविकास आघाडीने विचार करण्याची आवश्यकता आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!