🕒 1 min read
कोहिमा : नागालँडमधील विधानसभेत ऐतिहासिक घटना घडली आहे. ५८ वर्षांनी नागालँडच्या विधानसभेत राष्ट्रगीताची धून वाजवण्यात आली. एका ट्विटर युझरने याबाबतची माहिती दिली आहे.
नागालँडच्या विधानसभेत राष्ट्रगीताची धून वाजणे ही ऐतिहासिक घटना असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी ०१ डिसेंबर १९६३ रोजी नागालँडला राज्याचा दर्जा देण्यात आला. नागालँड विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले. या अधिवेशनाच्या सुरुवातीला राज्यपालांच्या अभिभाषणावेळी राष्ट्रगीताची धून वाजवण्यात आली. त्यानंतर नागालँडच्या विधानसभेत कधीही राष्ट्रगीत गायिले अथवा वाजवण्यात आले नाही.
यासंदर्भात बोलताना नागालँड विधानसभेचे अध्यक्ष शरिंगेन लोंगकुमर यांनी सांगितले की, विधानसभेत राष्ट्रगीताची धून वाजवण्याचा निर्णय त्यांचा होता आणि त्यासाठी मुख्यमंत्री नेफियू रियो यांची सहमती घेण्यात आली होती. राष्ट्रगीताची धून वाजवण्यात आली, तेव्हा विधानसभेतील किती सदस्यांनी राष्ट्रगीत म्हटले, याबाबत माहिती मिळाली नाही. मात्र, विधानसभेतील सर्व सदस्यांनी राष्ट्रगीताची धून सुरू झाल्यावर उभे राहून राष्ट्रगीताला सन्मान दिला, असे समजते.
विधानसभेत राज्यपालांचे स्वागत नव्या पद्धतीने करण्याचा मानस होता. राज्यपालांचे पद घटनात्मक असल्यामुळे त्यांचे स्वागत नेहमी राष्ट्रगीताने व्हायला हवे. त्यामुळे राष्ट्रगीताची धून वाजवण्यात आली. या ऐतिहासिक घटनेची पुढे परंपरा होईल आणि ही परंपरा कायम राहील, असा विश्वास विधानसभा अध्यक्षांनी व्यक्त केला.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठवाड्यात कोरोनाचा उद्रेक; जालन्यात संपूर्ण गाव सील; परभणीत आठवडी बाजार बंद
- जालनेकरांनो काळजी घ्या! जिल्ह्यात कोरोना वाढतोय; शनिवारी तिघांचा बळी; ७० नवे रुग्ण
- परभणीत ३१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; उपचारादरम्यान एकाचा मृत्यू
- दीक्षाभूमी एक्स्प्रेसने मार्ग बदलला; जालना-औरंगाबादेतील उत्तर भारतीय नागरिकांची गैरसोय
- पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या, बीड जिल्ह्यातील घटना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
