Share

‘हितचिंतकांच्या सहकार्याने आजपर्यंत सामाजिक काम चांगल्या पद्धतीने उभे करू शकलो’

Published On: 

सोलापूर : लोकमंगल उद्योग समूहाची आतापर्यंतची वाटचाल आणि लोकमंगल समूहाने राबवलेले विविध सामाजिक उपक्रम संपूर्णपणे लोकाभिमुख आहेत. ते पुढील काळातही अविरत राबवण्यात येणार आहेत. त्यामुळे यापुढील काळात लोकमंगल कोणताही व्यावसायिक उद्योग उभा करणार नाही. आपण समाजातील शेवटच्या घटकापर्यंत काम करणार आहे, त्यासाठी आपल्या सर्वांची साथ आवश्यक आहे, असे प्रतिपादन लोकमंगल उद्योगसमूहाचे संस्थापक अध्यक्ष तथा आ. सुभाष देशमुख यांनी केले.

सोलापुरातील हेरिटेज मंगल कार्यालयात आयोजित लोकमंगल व्हिजन 2020 च्या कार्यक्रमात आ. देशमुख बोलत होते. यावेळी व्यासपिठावर लोकमंगल फौंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख, लोकमंगल पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी पाटील आदी उपस्थित होते.

आ. देशमुख पुढे म्हणाले की, लोकमंगल समूहाच्या हितचिंतकांच्या सहकार्याने आजपर्यंत सामाजिक काम चांगल्या पद्धतीने उभे करू शकलो. लोकमंगलचे प्रत्येक उपक्रम लोकाभिमुख आहेत. यापुढेही समूहातील युनिट कडून वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येणार आहे. प्रत्येक सोलापूरकरांच्या सूचना घेऊन त्यावर मी काम करण्याचा प्रयत्न करणार आहे, असेही देशमुख यांनी सांगितले.

यावेळी प्रास्ताविक रोहन देशमुख यांनी केले. याप्रसंगी पतसंस्थेचे संचालक नाना गायकवाड, लोकमंगल बँकेचे संचालक प्रा. देवानंद चिलवंत, लोकमंगल फाउंडेशनचे संचालक सुनील गुंड तसेच लोकमंगल उद्योग समूहाचे सर्व संचालक व कर्मचारी अधिकारी, नागरी सहकारी बँक आणि लोकमंगल पतसंस्थेचे ठेविदार, सभासद उपस्थित होते. सूत्रसचांलन शिवाजी पवार यांनी केले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!