Share

महाराष्ट्राची भाषा फक्त मराठीचं आहे व राहील ; तारक मेहता वादावर ‘या’ बड्या अभिनेत्याची प्रतिक्रिया

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : चूक त्यांची नाही,आपलीच आहे.आपण जो पर्यंत आपल्या मातृभाषेत आपल्या राज्यात व्यवहार करणार नाही तो पर्यंत हे असच चालत राहणार.पण ज्यांना ज्यांना मुंबईची भाषा हिंदी आहे असं वाटतं त्यांना ओरडून अभिमानाने सांगतो की मुंबई नाही तर महाराष्ट्राची भाषा फक्त मराठी आहे,अशा शब्दात मराठी अभिनेते सुबोध भावे यांनी तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेच्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

तर झाले असे, सब टिव्हीवरची मालिका ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ पुन्हा एकदा नव्या वादात सापडली आहे. नुकत्याच प्रसारित झालेल्या एका भागात, या मालिकेतील जेठालालचे वडील बापुजी यांच्या तोंडी, मुंबईची भाषा हिंदी असल्याचा संवाद दाखवण्यात आलेला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यावर अक्षेप घेतला असू सब टिव्हीने याबद्दल माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

या मालिकेत प्रसारित करण्यात आलेल्या भागात प्रत्येक व्यक्ती हा आपल्या मातृभाषेमधूनच संवाद साधणार असा पण करतो. यातून तयार झालेल्या विसंवादामध्ये बापुजी हे पात्र मध्यस्थी करतं आणि सर्वांचं मनोमिलन घडवून आणतं. यादरम्यान…बापुजींच्या तोंडी, मुंबईची भाषा हिंदी असल्याचा संवाद दाखवण्यात आलेला आहे. त्यामुळे या प्रकरणी आता सब टिव्ही काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, यावर मनसेने कठोर भूमिका घेत हेच ते मराठीचे ‘मारक’ मेहता असल्याचं म्हटलं आहे. तर मुंबईची भाषा मराठी आहे हे माहिती असतानाही मालिकांमधून पद्धतीशीर अपप्रचार सुरु असतो. या गुजराती किड्यांची वळवळ थांबवावीच लागेल. यात काम करणाऱ्या मराठी कलाकारांनाही याची शरम वाटत नाही याचीच शरम वाटत असल्याचं मनसे नेते अमेय खोपकरांनी म्हटलं आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!