Share

औरंगाबाद नामांतराचा मुद्दा पेटला, वैजापूरमध्ये ‘संभाजीनगर’ लिहिलेली बस फोडली

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : शहराच्या नामांतराचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच शहरात बॅनरवॉर भडकल्याचेही पाहायला मिळाले होते. परंतु आता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेलाही त्याची झळ पोहोचत असल्याचे दिसून येत आहे.

वैजापूर तालुक्यात बस डेपोमध्ये उभ्या असलेल्या बसवर संभाजीनगर फलक लागलेला होता. अज्ञात तरुणांनी दगडफेक करून बसची काच फोडल्याची घटना घडली. यामुळे पुन्हा एकदा औरंगाबाद नामांतराचा मुद्द्यावरून राजकारण पेटण्याची चिन्हे आहेत.

मागच्या अनेक दिवसांपासून औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर असे करण्यासाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेनेचीही तीच भूमिका आहे. परंतु राज्यातील सत्तेतील सहकारी असलेल्या काँग्रेसचा याला ठाम विरोध आहे. यामुळे शिवसेना व काँग्रेस नेत्यांमध्ये तुंबळ वाक्युद्ध रंगल्याचे पाहायला मिळाले. दुसरीकडे, भाजपने शिवसेनेला याच मुद्द्यावरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. आता वैजापुरातील बस फोडल्याच्या घटनेने हे वातावरण जास्तच गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!